Nano Urea Agrowon
ॲग्रो विशेष

Nano Urea : इफकोच्या नॅनो युरियात नत्राचे प्रमाण वाढविले

Nano Urea Update : केंद्र सरकारने इफको कंपनीच्या द्रवरूप स्वरुपातील १६ टक्के नत्राचे प्रमाण असलेल्या नॅनो युरिया नव्या श्रेणीस मान्यता दिली आहे.

Team Agrowon

Pune News : केंद्र सरकारने इफको कंपनीच्या द्रवरूप स्वरुपातील १६ टक्के नत्राचे प्रमाण असलेल्या नॅनो युरिया नव्या श्रेणीस मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने काढलेल्या आदेशानुसार तीन वर्षाकरिता ही मान्यता असेल.

इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को- ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफको) या संस्थेने नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वप्रथम नॅनो युरियाची २०२१ मध्ये निर्मिती केली. यावेळी नॅनो युरियामध्ये नत्राचे प्रमाण ४ टक्के होते.

नव्या श्रेणीत नॅनो युरियामध्ये नत्राचे प्रमाण आता १६ टक्क्यांवर नेण्यात आले आहे. केंद्राने त्यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे शेतकऱ्यांना हे नवे उत्पादन लवकरच बाजारात उपलब्ध होईल.

नॅनो युरियामधील १६ टक्के नत्राबाबत मंगळवारी (दि.१६) केंद्र सरकारने शासकीय राजपत्र प्रसिद्ध करून खत नियंत्रण आदेशामध्ये या खताचा समावेश केला आहे. आगामी खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नव्या श्रेणीच्या नॅनो युरियामध्ये फिजिकल २० ते ५० एनएम आणि हायड्रोडायनॅमिक २० ते ८० एनएम (किमान ५० टक्के घटकांचा आवश्‍यक आकार) आकाराचे अत्यंत सूक्ष्म नत्र कणांचे द्रावण असते.

ज्यांची कार्यक्षमता ९० टक्के आहे. तर, सामू ४ ते ८.५ असणार आहे. नॅनो युरिया हाताळणीला सोपे, किफायतशीर आणि पिकांच्या उत्पन्नात आणि गुणवत्तेमध्ये भरीव वाढ करत असल्याचा दावा ‘इफको’चे महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक उदय तिजारे यांनी पत्रकात केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT