Maharashtra Politics Agrowon
ॲग्रो विशेष

Uddhav Thackeray: लाज असेल तर भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घ्या : उद्धव ठाकरे

Maharashtra Politics: भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्यांना मदत मिळत नाही. जर तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घ्या, असे आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. ११) दिले.

Team Agrowon

Pune News: भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्यांना मदत मिळत नाही. जर तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घ्या, असे आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. ११) दिले.

सरकारविरोधात जनआक्रोश आंदोलनात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने केल्यानंतर मातोश्री निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे म्हणाले, की भ्रष्ट्रचाराच्या प्रकरणांमध्ये मंत्र्यांची नावे समोर येत आहेत. मात्र, सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही.

तुम्हाला थोडीशी जरी लाज वाटत असेल तर भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घ्या, अशी मागणी त्यांनी केली. मुळात गद्दारांना डोके नव्हे तर खोकेच आहेत, अशी टीका त्यांनी केली. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मात्र, त्यांना केवळ मदतीचे आश्वासन दिले जात आहे, अशी त्यांनी केली.

महायुती सरकारमधील वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखालील मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने राज्यात सोमवारी (ता. ११) जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ठाण्यात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक क्रांतीचौकात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. अकोल्यात जिजामाता प्रेक्षागृह मैदान परिसरात आणि परभणीतही रास्तारोको करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : राज्यात १५ हजार पोलीस पदासाठी होणार भरती; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

Kharif Sowing 2025 : कापूस, सोयाबीन, तुरीकडे शेतकऱ्यांची पाठ; मक्याला मात्र पसंती

Dairy Farming Success : तेवीस वर्षाचा पृथ्वीराज झालाय कुटुंबाचा मुख्य कणा

Development Fund Crisis: आमदारांना निधी मिळेना! ९ महिन्यांपासून राज्यात विकासकामे ठप्प

Poultry Farming Success : कष्ट करण्याची जिद्द हवी, नोकरीपेक्षा शेतीच बरी

SCROLL FOR NEXT