Dairy Farming Success : तेवीस वर्षाचा पृथ्वीराज झालाय कुटुंबाचा मुख्य कणा

Dairy Business Maharashtra : दररोज शंभरहून अधिक किलोमीटर प्रवास करून महाविद्यालय शिक्षण करण्यासह दूध संकलन, स्वतः रतीब घालण्याचे काम करतो.
Dairy Farming
Dairy Farming Agrowon
Published on
Updated on

Rural Youth Entrepreneurship : आई-वडिलांच्या कष्टाचे चीज स्वतः श्रम उपसूनच करण्याची इच्छा आजच्या युवा वर्गामध्ये कमी प्रमाणात पाहण्यास मिळते. आजच्या मोबाईलच्या युगात कष्टांचे हे भान, महत्त्व हरवून गेले आहे. परंतु समाजात असेही युवक आहेत की आपल्या कष्टातून, विचारातून आणि वागणुकीतून त्यांनी आजच्या युगातही आदर्श व प्रेरणा निर्माण कली आहे. होळी (ता. औसा, जि. लातूर) येथील पृथ्वीराज सूर्यवंशी या अवधा तेवीस वर्षीय तरुण त्यापैकीच एक म्हणावा लागेल.

सर, मी दुग्धव्यवसाय करतो

लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालय राज्यात प्रसिद्ध आहे. शिक्षणात शिखर गाठलेले डॉ. महादेव गव्हाणे महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. ते नियमित विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. मागीलवर्षी प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसोबत ते संवाद साधत होते. पुढे कशात करिअर करायचे आहे अशा प्रश्नातून ते विद्यार्थ्यांची कलचाचणी घेत होते.

बहुतांश विद्यार्थी नोकरी किंवा व्यवसाय करणार असल्याचे सांगत होते. अशावेळी एक विद्यार्थी म्हणाला, सर, मी सध्या दूध व्यवसाय करतो. दररोज ऐंशी लिटर विक्री करतो. आणखी पंचवीस म्हशी घेऊन व्यवसाय वाढवणार आहे. त्याच्या या उत्तराने सर्वांचेच लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. काही विद्यार्थी हसले.

तर काही धीरगंभीर झाले. डॉ. गव्हाणे यांना कमी वयात वेगळी वाट चालत असलेल्या विद्यार्थ्याचे खूप कौतुक वाटले. त्याची जवळ बोलावून पाठ थोपटली. आणि त्याला शिक्षणासह शेती व्यवसायातही पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.

Dairy Farming
Dairy Farming : शेती- दुग्ध व्यवसायातून नफा अन् समाधानही

लहानपणीच शेती कारभाराला सुरवात

पृथ्वीराजच्या कुटुंबाची मांजरा नदीजवळील घरापासून दोन किलोमीटरवर वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. एक एकरांत सोयाबीन तर एक एकरांत चारा पीक आहे. वडील बालाजी पूर्वी संकरित गोपालन करीत. कालांतराने हा व्यवसाय बंद केला. पत्नी ज्योती (पृथ्वीराजची आई) यांच्यासह ते घरची शेती व मजुरीही करीत.

लहानपणापासूनच पृथ्वीराजला शेतीची आवड होती. दुसऱ्यांच्या हाताखाली आई-वडिलांनी काम करणे त्याला आवडत नव्हते. आपल्याच शेतीत राबावे, ती प्रगत करावी व आपणच मालक असावे असे त्याचे विचार होते. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरच त्याने आई वडिलांच्या मार्गदर्शनातून व मदतीतून म्हैसपालन सुरु केले.

उधारीवर म्हैस खरेदी करून कुटुंबाने काही महिन्यात पैसे फेडले देखील. मग एकेक करीत म्हशी वाढवल्या. सध्या कुटुंबाकडे सात ते आठ म्हशी आहेत. वडिलांना लकव्याचा आजार झाल्याने शेतीचा बहुतांश कारभार पृथ्वीराजने आपल्याच हाती सांभाळण्यास सुरवात केली.

रोजच धावपळ, कसरत

पृथ्वीराज सध्या बीएच्या दुसऱ्या वर्गात शिकतो. शिक्षण सांभाळून घरच्यांच्या मदतीने गोठ्यातील सर्व कामे करतो. पहाटे चार वाजता उठून त्याचा दिवस सुरू होतो. रात्री दहापर्यंत तो कामात व्यस्त असतो. मोबाईल पाहण्यासाठी देखील त्याच्याकडे पुरेसा वेळ नसतो. सकाळी म्हशींना चारा, खुराक, स्वच्छता,धारा काढणे ही कामे तो करतो.

मग गावातील दुग्धोत्पादकांकडील दूध संकलन करतो. घरचे सुमारे ४० लिटर तर शेतकऱ्यांचे ४० लिटर असे दररोज ऐंशी लिटर दूध संकलन होते. मग अर्धा व एक लिटरमध्ये दुधाचे पॅकिंग होते. त्यानंतर दुचाकीवरून हे दूध दररोज लातूरला नेले जाते. तेथे शंभर ते सव्वाशेहून अधिक ग्राहकांना घरोघरी ते पुरवण्याचे काम पृथ्वीराज करतो.

दुपारी तो गावी परततो. रोज एकूण मिळून शंभर ते सव्वाशेहून अधिक किलोमीटर त्याचा प्रवास होतो. परंतु एक दिवसही खंड न पडता, न थकता आपली जबाबदारी तो रोज पार पाडतो. दुपारनंतर पुन्हा शेतीतल्या कामांना तो जुंपून घेतो. त्याची बहिण श्रद्धा बी.एस्सी. शाखेत शिकते आहे. तिलाही सकाळी महाविद्यालयात सोडण्याची जबाबदारी पृथ्वीराजवर असते.

कुटुंबाची आर्थिक जबाबदारी पेलली

पृथ्वीराजने केवळ तेविसाव्या वर्षी घरच्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी पेलली आहे. दुग्धव्यवसायातून तो चांगल्या प्रकारे उत्पन्न कमावतो. सर्व पैसा आई-वडिलांकडे सोपवतो. त्यातून घरचा सारा प्रपंच, खर्च, शिक्षण या साऱ्या गोष्टी होतात. सुरवातीला पानचिंचोली येथील विद्यालयातील शिक्षकांनी दुधाची खरेदी करत बळ दिले.

आता शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गव्हाणे व प्राध्यापक वर्ग प्रोत्साहन देतात. पृथ्वीराज सांगतो की सुरवातीची दोन वर्ष रोजचे दूध संकलन तीस लिटर होते. दुधाची गुणवत्ता व ग्राहकसेवा चांगली ठेवल्याने मागणी वाढली. शेतीला जाण्यासाठी रस्ता नाही. अनेकदा चिखल तुडवतच जावे लागते.

त्यामुळे येत्या काळात रस्त्याकडेला दोन एकर जमीन घेऊन पंचवीस म्हशींचा गोठा बांधायचा मानस आहे. आई-वडिलांना आपल्या मुलाचा सार्थ अभिमान आहे. आजोबा रावसाहेब (वय ७५) यांचाही कुटुंबाला आधार आहे. आजी अयोध्या (वय ६५) देखील घरी कामात मदत करतात.

सकाळ ते दुपारपर्यंत व त्यानंतर सायंकाळी सातनंतर घरी पीठगिरणीचा व्यवसाय हे कुटुंब करते. तिथेही पृथ्वीराजची मदत होते. म्हशींपासून वर्षाला सुमारे २० ते २२ ट्रॉली शेणखत मिळते. शेतात वापरून त्याची विक्रीही होते. सध्या पत्र्याच्या घरातच कुटुंबाचे वास्तव्य व व्यवसाय सुरु आहे.

Dairy Farming
Dairy Farming Success : दुग्ध व्यवसायात अंमळनेरची प्रगती

पदवी घेतल्यानंतर तो पोलिस भरतीची तयारी करत होता. प्रतिक्षा यादीपर्यंत त्याने मजल मारली. परंतु काठावर संधी हुकत असल्याने घरच्या शेतीतच चांगले करिअर करायचे अशी खूणगाठ मनाशी बांधली. वाघ बंधूंना पोल्ट्री व्यवसायात नफ्याबरोबर मोठा तोटाही सोसावा लागला. परंतु सर्व परिस्थितीत संयम व सहनशीलता टिकवून धैर्याने समस्यांशी सामना केला.सकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंत वेळापत्रकानुसार काम केले. त्यामुळेच कष्टाचे रूपांतर आज प्रगतीत झालेले दिसते.

उल्लेखनीय उलाढाल

आज वाघ ॲग्रो फार्म’ हे नाव परिसरात प्रसिद्ध झाले आहे. शेती व पूरक व्यवसायांमधून कुटुंबाने वार्षिक ५० लाखांच्या उलाढालीपर्यंत मजल मारली आहे. शेतीत भरपूर संधी आहेत. फक्त झटून काम करण्याची तयारी पाहिजे.

नोकरीपेक्षा शेतीच बरी असा मंत्र वाध बंधूंनी जपला आहे. पूर्वी कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याने आजोबा आणि वडिलांनी घेतलेल्या कष्टांची जाणीव त्यांनी ठेवली. अनेक जण त्यांच्या फार्मला भेटी देऊन कौतुक करतात. अन्य तरुणांचे वाघ बंधू मार्गदर्शक झाले आहेत.

पक्षीवाढ करून देण्याचा व्यवसाय

पाच वर्षांपासून पक्षी वाढवून (ग्रोइंग) पुरवठा करण्याचा व्यवसायही सुरू कला आहे. यात प्रति ४७ रुपये यानुसार एक दिवसीय पिल्ले आणून १०५ दिवसांपर्यंत त्यांचे संगोपन केले जाते. प्रति सशक्त पक्षी २४० रुपये दराने पोल्ट्री उत्पादकांना त्यांचा पुरवठा होतो. दर महिन्याला १८ हजार पक्षी उत्पादन करून मागणीनुसार मालेगाव, नाशिक, संगमनेर तालुक्यांमध्ये त्यांचा पुरवठा होतो.

शेतीतील प्रगती

वाघ कुटुंबाची ३५ एकर शेती आहे. त्यात डाळिंब, मका, कांदा, सोयाबीन आदी पिके असतात. पंकज कृषी पदवीधर असून त्याच्याकडे शेतीची जबाबदारी आहे. पीक पद्धतीत बदल करून त्यानेच डाळिंब लागवडीसाठी पुढाकार घेतला. जमीन सुपीकता, अन्नद्रव्ये व कीड- रोग व्यवस्थापन यांचा सूक्ष्म अभ्यास करून त्याने या पीक उत्पादनात कौशल्य विकसित केले आहे. नवीन तंत्रज्ञानाची जोड दिली आहे.

सध्या पाच एकरांत भगवा तर दोन एकरांत सोलापूर लाल वाण आहे. कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा प्रतिकूलेतही शेतीचे व्यवस्थापन सुकर केले आहे. कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी नितीन खिंडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. दोन शेततळी, ट्रॅक्टर आदींसाठी अनुदान तर राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत शेडनेटसाठी मंजुरी मिळाली आहे. पंधरा मजुरांना शेतीतून वर्षभर रोजगार दिला आहे.

अंकुश वाघ ९६८९१२२६३६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com