Marathwada Water Issue  Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Issue : ...तर न्यायालयाचा अवमान ठरेल

Jayakwadi Water : येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत जायकवाडीत पाणी न सोडल्यास हा उच्च न्यायालयाचा अवमान ठरेल.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत जायकवाडीत पाणी न सोडल्यास हा उच्च न्यायालयाचा अवमान ठरेल. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ मधील कलम २६ चे पालन न केल्यामुळे मराठवाड्यातील जनतेच्या वतीने मराठवाडा पाणी परिषदेतर्फे तीव्र आंदोलन करून एमडब्ल्यूआरआरकडे कायदेशीर दाद मागण्यात येईल, असा इशारा मराठवाडा पाणी परिषदेने दिला आहे.

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी वेळेत सोडा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी दिला आहे. शनिवारी (ता. २८) मराठवाड्याची जीवन वाहिनी असलेल्या जायकवाडीत ऊर्ध्व भागातील धरणातून पाणी वेळेत सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना संबंधित निवेदन दिल्यानंतर श्री. शिवपुरे यांनी भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, की मराठवाड्यात दुष्काळ आहे. सोडलेल्या पाण्यापैकी जवळपास ३० टक्के पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे ओल्या गोदावरी पात्रात त्वरित पाणी सोडल्यास याचा फायदा मराठवाड्यातील रब्बी पिकाबरोबरच उद्योग व पिण्यासाठी होईल. १० ते १५ टीएमसी पाणी ऊर्ध्व भागातील धरणातून मिळणार असे गृहीत धरून रब्बी पिकासाठी किमान तीन ते चार आवर्तन पाणी देण्याची आवश्यकता आहे.

तसे संबंधित अधिकाऱ्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आश्‍वासित करावे. यासाठी त्वरित कालवा समितीची बैठक घ्यावी. महाराष्ट्रात इतर विभागात कालवा समितीच्या बैठका झालेल्या आहेत.

मराठवाड्यातील रब्बी पिकाला पाणी नाही मिळाल्यास मराठवाड्यातील रब्बीचे क्षेत्र झपाट्याने घटून मराठवाड्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येणार आहे, असेही ते म्हणाले.

यासंबंधी दिलेल्या निवेदनावर जलतज्ज्ञ डॉ. शंकरराव नागरे, माजी सिंचन आयोग सदस्य डॉ. सर्जेराव ठोंबरे, जयसिंग हिरे, गटशेती प्रणेते डॉ. भगवानराव कापसे, सर्जेराव वाघ व मराठवाडा पाणी परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर सरोदे यांच्या सह्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Model Village: या गावाला शाब्बासकी हवीच!

Election Commission : ‘पिपाणी’ चिन्ह वगळले

Panchayati Raj : स्वातंत्र्यानंतर पंचायती राज व्यवस्थेचा विकास

Seed Bill 2025 : कृषी मंत्रालयाने नवीन बियाणे विधेयकाचा मसुदा केला जारी; ११ डिसेंबरपर्यंत सूचना पाठवता येणार

Bihar Election Results 2025: बिहारमध्ये 'एनडीए' द्विशतकाच्या दिशेने, सर्वात मोठा पक्ष कोणता?; RJD ला धक्का

SCROLL FOR NEXT