Sugarcane Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Bills : ऊस बिले थकवल्यास व्याजासह कारखान्यांना द्यावे लागणार पैसे

Sugarcane Farmer Strike : गेल्या दोन गळीत हंगामात शेतकऱ्यांची ऊस बिले कारखानदारांकडून थकविण्यात आल्यामुळे, राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांना ऊस बिलासाठी आंदोलने करावी लागली.

Team Agrowon

Solapur News : गेल्या दोन गळीत हंगामात शेतकऱ्यांची ऊस बिले कारखानदारांकडून थकविण्यात आल्यामुळे, राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांना ऊस बिलासाठी आंदोलने करावी लागली. या पार्श्वभूमीवर १४ दिवसांच्या आत ऊस बिले न दिल्यास ती १५ टक्के व्याजासह देण्याचा आदेश साखर आयुक्तांनी काढल्याची माहिती अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक प्रकाश घाळे यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना घाळे म्हणाले, ‘‘गत वर्षी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मातोश्री सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी काँग्रेस भवन येथे उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना भेट देऊन,

कारखान्याला बिले त्वरित देण्यास भाग पाडले होते. या गंभीर व देशव्यापी समस्येबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी राज्याचे सहकार मंत्र्याशी संपर्क साधून वारंवार निर्माण होणाऱ्या थकीत ऊस बिलांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले.

सहकारी तसेच खासगी कारखानदाराकडून ऊस बिले थकवण्याच्या समस्येमुळे राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशांमधील शेतकरी भयंकर त्रस्त झाले असून, कारखानदारांनी शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केल्यानंतर त्यांच्या उसाचे एफआरपीप्रमाणे होणारे ऊस बिल १४ दिवसांच्या आत अदा करणे,

हे कायद्याने बंधनकारक असून तसा कायदा अस्तित्वात असताना ही साखर कारखानदारांना याचा विसर पडला आहे, व ते शेतकऱ्यांची बिले थकवावीत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे, असेही ते म्हणाले.

यापुढे कोणत्याही साखर कारखान्याने बिले थकवली तर शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे आवाहनही घाळे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sudhir Mungantiwar: ज्यांचं अन्न खाता, त्यांच्याशी तरी खोटे बोलू नका; ‘कृषी समृद्धी’वरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

Shirur Jambut APMC: जांबूत येथील उपबाजार १५ वर्षांपासून बंद अवस्थेत

Pune Monsoon Rain: पुणे जिल्ह्यात विविध भागांत मॉन्सूनचे दमदार पुनरागमन

Seed Scam: शेतकऱ्यांचे आयुक्तालयाच्या छतावर आंदोलन; धाराशिव निविष्ठा घोटाळा प्रकरण

Heavy Rainfall Relief: मागील वर्षीच्या अतिवृष्टीचे १६ हजार कोटी खात्यात जमा; मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची माहिती

SCROLL FOR NEXT