Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग रद्द न केल्यास आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय नाही

Highway Issue : ‘‘लाडक्या बहिणींसाठी ओवाळणी म्हणून शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा आदेश घेऊनच मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात यावे, अन्यथा आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही,’’

Team Agrowon

Kolhapur News : ‘‘लाडक्या बहिणींसाठी ओवाळणी म्हणून शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा आदेश घेऊनच मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात यावे, अन्यथा आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही,’’

असा इशारा कृती समितीच्या महिला प्रमुख अमृता मोरे यांनी मंगळवारी (ता.२०) पत्रकार परिषदेत दिला. शेती संपादित करून तसेच शेतकरी महिलांचे संसार उद्ध्वस्त करून, लाडकी बहीण योजना आणणे म्हणजे एकप्रकारे यमराज नीती आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

‘‘गोवा ते नागपूर अशा ८०५ किलोमीटर लांबीच्या बारा जिल्ह्यांतून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचे गॅझेट नोटिफिकेशन ७ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र युती सरकारने जाहीर केले आहे. या महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत.

‘लाडकी बहीण’ योजनेचे दीड हजार रुपये अनुदान देत असल्याचे मुख्यमंत्री जे सांगत आहेत, ते खरेतर ‘लाडका कंत्राटदार’ या योजनेअंतर्गत जनतेकडूनच कोट्यवधी रुपये काढून घेणार आहेत. याचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिला व लहान मुलांवर होणार आहे,’’ असेही महिला म्हणाल्या.

या वेळी स्वाती क्षीरसागर, सविता पाटील, सुभद्रा मानकापुरे, संगीता मगदूम, शुभांगी मगदूम, मनीषा मुगडे, तिथी कांबळे, अर्चना कुडाळकर, रोहिणी शिंदे, धनश्री पुजारी, पूनम पोवार यांच्यासह विविध गावांतील महिला शेतकरी उपस्थित होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : पीकविम्याची किरकोळ भरपाई देऊन शेतकऱ्यांची थट्टा करू नका; अधिकाऱ्यांना कृषिमंत्री चौहान यांचा इशारा

Chana Sowing: बीजप्रक्रियेनंतरच करा हरभरा पेरणी

Student Entrepreneurship: ‘कृषी’चे विद्यार्थी बनताहेत बेकरी उद्योजक

Parth Pawar : पार्थ पवारांनी १८०० कोटींची जमीन ३०० कोटींमध्ये हडपली; अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

Sugarcane Harvest: ऊस तोडणीचे शास्त्रीय नियोजन

SCROLL FOR NEXT