Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Scheme : पीकविमा दिला नाही तर यंदा योजना प्रचाराचे वाहन फिरू देणार नाही

Prime Minister's Crop Insurance Scheme : उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या व पंतप्रधान पीकविमा योजनेबाबत बैठक घेत कार्यवाही न केल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही.

Team Agrowon

Crop Insurance Akola News : उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या व पंतप्रधान पीकविमा योजनेबाबत बैठक घेत कार्यवाही न केल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. यामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेच्या प्रचाराचे वाहन दिसताक्षणी फोडण्याचा इशारा शेतकरी पुत्रांनी दिला आहे.

उरळ (ता.बाळापूर) येथील गोपाल पोहरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन दिले.

याबाबत म्हटले आहे, की खरीप, रब्बी हंगामात जिल्हाभरात पंतप्रधान पीकविमा योजनेचा प्रचार रथ शेतकऱ्यांनी सदर योजनेत सहभागी होण्यासाठी फिरवला जातो. शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले जाते.

मागील खरीप हंगामात हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अजूनपर्यंत पीकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. Crop Insurance Scheme

प्रशासनाने पालकमंत्र्यांसोबत बैठक घालून देण्याचे व पीक विमा योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

योजनेच्या प्रचार वाहनाला दिसताक्षणी फोडणार असल्याचा इशारा देण्यात आला. तरी पीकविम्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी या शेतकरी पुत्रांनी केली आहे.

खरीप हंगामात तोंडावर आलेला असताना अजूनही शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही. कुणाला ९५ रुपये दिले, तर कुणाला ३०० रुपये. असंख्य शेतकरी नुकसान होऊनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने पुढाकार घेत विमा कंपनीकडून पीकविमा मिळवून द्यावा. थट्टा थांबवावी.
गोपाल पोहरे, शेतकरी पुत्र, उरळ, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT