Nanded News : नुकसानग्रस्त पीक विमाधारकांच्या (Crop Damage Insurance) मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यासंदर्भात अधिसूचना लागू केली होती. यातील ३६८ कोटी रकमेतील ८५ टक्क्यांनुसार यापूर्वी ३१० कोटींचा परतावा मिळाला होता.
यातील शिल्लक राहिलेल्या १५ टक्क्यांनुसार ५८ कोटी रुपये बुधवारी (ता. २९) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. इतर दोन घटकांतर्गत १०१ कोटींचा परतावा पुढील हप्त्यात शेतकऱ्यांना मिळेल, अशी माहिती कृषी विभागाच्या (Agriculture department) सूत्राने दिली.
जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) खरीप हंगाम २०२२ मध्ये युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीकडे दहा लाख ५७ हजार ५०८ अर्जदार शेतकऱ्यांनी सहा लाख ५१ हजार ४२२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते.
यात सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी, उडीद व मूग या पिकांसाठी विमा काढण्यात आला होता. दरम्यान, यंदा अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे खरिपातील सव्वापाच लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले होते.
यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मीड सीझन ॲडव्हर्सिटी) घटकांतर्गत नुकसानीच्या २५ टक्के भरपाई मिळावी यासाठी अधिसूचना जाहीर केली होती. ही अधिसूचना विमा कंपनीने मंजूर करून सोयाबीन, कपाशी, तूर व ज्वारी या पिकांसाचा विमा भरलेल्या सर्वच शेतकऱ्यांना ३६७ कोटींची रक्कम मंजूर केली.
यातील ८५ टक्क्यांनुसार ३१० कोटी रुपये शेतकऱ्यांना यापूर्वीच मिळाले आहेत. यातील शिल्लक १५ टक्क्यांनुसार ५८ कोटी रुपये बुधवारी (ता. २९) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
१०१ कोटी पुढील हप्त्यात जमा होणार
याच काळात झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनीकडे दावा दाखल करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यात चार लाख ७३ हजार ५७० विमाधारकांना माहिती कळविली होती.
यात कंपनीकडून पंचनामा झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत ९७ कोटी ९७ लाख, तर काढणीपश्चात नुकसान या घटकांतर्गत तीन कोटी २८ लाख असे एकूण १०१ कोटी २५ लाखांचा परतावा मंजूर केला आहे. हा विमा परतावा पुढील आठ ते दहा दिवसांत मिळेल, अशी माहिती विमा कंपनीच्या सूत्राने दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.