Eknath Shinde  Agrowon
ॲग्रो विशेष

Eknath Shinde : उठाव केल्यानंतर मी शिवसेना जिवंत केली

Shivsena : शिवसेनेत उठाव केल्यानंतर मी शिवसेना जिवंत केली. बाळासाहेब व आनंद दिघे यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. मात्र काहींनी मला व माझ्या आमदारांना गद्दार व खोके म्हणून हिणवले.

Team Agrowon

Nashik News : शिवसेनेत उठाव केल्यानंतर मी शिवसेना जिवंत केली. बाळासाहेब व आनंद दिघे यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. मात्र काहींनी मला व माझ्या आमदारांना गद्दार व खोके म्हणून हिणवले. मात्र आम्ही थांबलो नाही. काम करत राहिलो शिवसेना जगवली, असे उपमुख्यमंत्री व मुख्य शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळवून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचा राज्यभर आभारदौरा सुरू आहे. शुक्रवारी (ता. १४) संध्याकाळी हुत्तात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या जाहीर सभेत शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले.

या वेळी शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.सुरवातीला ग्रामीण पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, की २०२२ मध्ये मी उठाव केला. मात्र त्या उठावामाणे त्या वेळच्या शिवसेनेची काँग्रेस होत असल्याचे महत्त्वाचे कारण होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा चालविणाऱ्या एकनाथ शिंदे यांना हे कदापि सहन झाले नाही. त्यामुळे उठाव करावा लागला. जिवाची पर्वा केली नाही, लढलो व जिंकलो.

मुख्यमंत्री झाल्यानंतर १८ ते २० तास काम केले. जनतेशी ‘फेस टू फेस’ चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.‘फेसबुक’ वर लाइव्ह दर्शन देऊन काम केले नाही, असे सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. लाडक्या बहिणींचे दुःख मला माहीत होते. म्हणून त्यांच्यासाठी योजना आणली.

मात्र विरोधकांनी खोडा घातला. पण काम करण्याचे थांबविले नाही. चांगल्या कामाचे चांगले फळ मिळते म्हणून लाडक्या बहिणीने सावत्र भावांना जोडा लगावला. मी शब्द पाळणारा माणूस आहे. तो शब्द मी पाळतो व पाळणार. मी साहेबांचा कार्यकर्ता आहे. विरोधकांनी मला हलक्यात घेऊ नये, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या तयारीला लागा

विधानसभा निवडणुकीत कार्यकर्ते नेत्यांसाठी झटले. नेते निवडून आले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्ते निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांची आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. आगामी निवडणुकीमध्ये उरलीसुरली उबाठा संपवून टाका, असे शिंदे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT