PDKV  Agrowon
ॲग्रो विशेष

PDKV Shiwar Feri : ‘पंदेकृवि’ च्या शिवारफेरीने गाठला उच्चांक

Latest Agriculture News : विद्यापीठांनी संशोधीत केलेले पीकवाण, तंत्र, शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित शिवारफेरीला यंदा उदंड प्रतिसाद मिळाला.

Team Agrowon

Akola News : विद्यापीठांनी संशोधीत केलेले पीकवाण, तंत्र, शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित शिवारफेरीला यंदा उदंड प्रतिसाद मिळाला. या वर्षी तीन दिवसांत सुमारे ३५ हजारांवर शेतकऱ्यांनी प्रगत शेती तंत्रज्ञान जाणून घेतले. विद्यापीठाने २० एकर प्रक्षेत्रावर लागवड केलेले विविध पीकवाण, तंत्र पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.

विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त दरवर्षी शिवारफेरी आयोजित केली जाते. यावर्षी ही शिवारफेरी २९ सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या काळात झाली. विदर्भातील ११ जिल्ह्यातील शेतकरी या शिवारफेरीला उपस्थित राहले.

शिवारफेरीच्या रविवारी (ता. १ ऑक्टोबर) झालेल्या समारोपीय गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांतील शेतकरी उपस्थित होते. शेवटच्या दिवशीही विद्यापीठाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता.

विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभाग, सेंद्रिय शेती प्रात्यक्षिक प्रकल्प, भरडधान्ये प्रक्रिया केंद्र, काढणी पश्चात शेतमाल प्रक्रिया केंद्र, कापूस संशोधन केंद्र, अखिल भारतीय समन्वीत संत्रा वर्गीय फळे संशोधन केंद्र, ज्वारी संशोधन केंद्र, कडधान्य संशोधन केंद्र, तेलबिया संशोधन केंद्र, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग, नागार्जुन वनौषधी विभाग आणि २० एकरांवर साकारलेल्या थेट पीक प्रात्यक्षिक प्रक्षेत्राच्या ठिकाणी शेतकऱ्यांची, कृषीच्या विद्यार्थी विद्यार्थिनीची गर्दी बघावयास मिळाली.

समारोपीय चर्चासत्रात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना शास्त्रज्ञांनी सविस्तर उत्तरे देत शंका निरसन केले. समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते. शेतकरी प्रतिनिधी म्हणून वर्धा जिल्ह्यातील राजाराम देशमुख, ज्योतीताई नरेंद्र काळे, नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे,

शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ.सुरेंद्र काळबांडे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशवंत शंभरकर यांनी केले. मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. उमेश चिंचमलातपुरे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat : अतिवृष्टीची मदत, पिकविमा आणि केंद्रीय पथकाच्या पाहणीवरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा

Micro Plastic Pollution: मायक्रोप्लॅस्टिक प्रदूषणाचे माती, पिकांसाठी संकट

Rabbi Anudan GR: मराठवाड्यात ४ हजार ४८६ कोटी रब्बी अनुदान वाटपास मंजुरी

Turmeric Farming: हळद पिकात जैविक निविष्ठांवर भर

Farmer Protest: जातीकडून शेती-मातीकडे...

SCROLL FOR NEXT