PDKV Shiwar Feri : शेतकऱ्यांच्या गर्दीने ‘पंदेकृवि’चे शिवार फुलले

Latest Agriculture News : कृषी विद्यापीठ, कृषी क्षेत्रातील कंपन्यांनी संशोधित केलेल्या विविध पिकवाणांचे थेट प्रात्यक्षिक बघण्यासाठी यंदा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीला शेतकऱ्यांची मोठी गर्दी उसळली आहे.
PDKV Akola
PDKV Akola Agrowon
Published on
Updated on

Akola News : कृषी विद्यापीठ, कृषी क्षेत्रातील कंपन्यांनी संशोधित केलेल्या विविध पिकवाणांचे थेट प्रात्यक्षिक बघण्यासाठी यंदा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीला शेतकऱ्यांची मोठी गर्दी उसळली आहे.

पहिल्या दिवशी १२ हजारांवर शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. तर शनिवारी (ता. ३०) दुपारपर्यंत ५ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी आटोपली होती. यंदा शिवार फेरीत गर्दीने उच्चांक गाठला आहे. आज (ता. १) शिवारफेरीचा समारोप होणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त आयोजित शिवारफेरीला यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यापीठाने २० एकरांत २०० वर पीकवाणांचे प्रात्यक्षिक तयार केले आहेत. हे पाहण्यासाठी शेतकरी येत आहेत. शेतकरी प्रात्यक्षिक पाहून विविध प्रकारचे प्रश्‍न शास्त्रज्ञांना विचारून माहिती घेत आहेत.

PDKV Akola
PDKV Shiwar Feri : ‘पंदेकृवि’च्या शिवारफेरीसाठी यंदा २० एकर प्रक्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके

अखिल भारतीय सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य योजना मृद्‍ विज्ञान विभागाच्या पुढाकाराने धारणी परिसरातील घोटा, मंथवडी, बोरीकर, चीजी, चावऱ्या, नागझिरा आदी गावांतील एकूण २५ शेतकरी शिवार फेरीत सहभागी झाले. या शेतकऱ्यांना सूक्ष्म अन्नद्रव्य योजनेतून प्रति शेतकरी दोन लिटर ‘मायक्रो ग्रेड दोन’ या द्रवरूप खताचे वितरण करण्यात आले.

परसबागेत लावण्यासाठी त्यांना किचन गार्डनिंगचे बियाणे देण्यात आले. मृद्‍ विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजय भोयर यांच्या नेतृत्वात सूक्ष्म अन्नद्रव्य योजनेचे डॉ संदीप हाडोळे व प्रशांत सरप यांनी त्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्यासोबत चर्चा केली. आज (ता. १) पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील शेतकरी, विद्यार्थी शिवारफेरीत सहभागी होतील.

PDKV Akola
PDKV Shiwar Feri : ‘पंदेकृवि’च्या शिवार फेरीला मोठा प्रतिसाद

शिवारफेरीत काय बघाल? उद्यानविद्या प्रक्षेत्र

फळशास्त्र विभागांतर्गत २८ हेक्टर क्षेत्रावर फळपिकांच्या सुधारित वाणांची माहिती आहे. प्रामुख्याने इंडो- इस्राईल उच्च तंत्रज्ञानावर आधारित संत्रावर्गीय फळ पिकांची लागवड व लागवड पश्‍चात यंत्राद्वारे छाटणी तंत्रज्ञान याबाबत माहिती, मार्गदर्शन मिळते.

फळपिकामध्ये गुणवत्तापूर्ण कलमांची निवड कशी करावी? यासोबतच उच्च तंत्रज्ञानावर आधारित कलम व रोप निर्मितीसाठी आवश्यक प्राथमिक रोपवाटिका, द्वितीय रोपवाटिका (कंट्रोल पॉलिहाउस, ग्रीन हाउस) आदींची माहिती दिली जात आहे.

फुलशास्त्र विभाग

गुलाबाची मल्चिंग, आच्छादनावर लागवड, निशिगंध व शेवंतीच्या निरनिराळ्या जातींची प्रायोगिक लागवड, झेंडू फुलपिकाच्या संकरित वाणाची लागवड, डेझी फुलपिकाची लागवड.

भाजीपाला शास्त्र विभागात

हरितगृहातील भाजीपाला लागवड, भाजीपाला रोपवाटिका आवळा- हळद अंतर पीक पद्धती, मिरचीमधील ‘क्रॉप कव्हर तंत्रज्ञान, आधुनिक हळद लागवड तंत्रज्ञानसोबतच आवळा फळपिकामध्ये हळद आंतरपीक लागवड तंत्रज्ञान.

यंदाची शिवारफेरी विशेष आकर्षणाची ठरली. यंदा एकाच ठिकाणी विद्यापीठ तसेच कंपन्यांच्या वाणांची तुलनात्मक पाहणी करता आली. सोयाबीनचे विविध वाणसुद्धा लावलेले दिसले. त्यांच्यातील फरक जाणता आला. आंतरपिक पद्धतीचे ‘डेमो प्लॉट’ थेट पाहायला मिळाला.
- मोहन जगताप, शेतकरी, वळती, जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com