Sugarcane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : ऊस दराची कोंडी फुटणार कशी?

Sugarcane Season 2023 : गतवर्षी दोन हजार २०० ते अडीच हजारापर्यंत प्रतिटन ऊस दर दिला होता पण त्यात अद्याप काही कारखान्यानी संपुर्ण रक्कम अदा केलेली नाही.

Team Agrowon

Dharashiv News : ऊस हंगामाला सुरुवात होणार असली तरी कोणत्याही साखर कारखान्याने अद्याप दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे ही दराची कोंडी कशी फोडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिले आहे. गतवर्षी दोन हजार २०० ते अडीच हजारापर्यंत प्रतिटन ऊस दर दिला होता पण त्यात अद्याप काही कारखान्यानी संपुर्ण रक्कम अदा केलेली नाही.

त्यामुळे यंदा मात्र शेतकऱ्यांकडुन अगोदर दर जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यावर्षी काही गावामधील शेतकऱ्यांनी साडेतीन हजार रुपयाची दराची मागणी केली आहे. त्यावर कारखान्याकडुन कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने ही कोंडी फुटणार कशी हे पाहावे लागणार आहे.

यंदा जिल्ह्यामध्ये ७५ हजार हेक्टर ऊसाची नोंद प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडे केली आहे, क्षेत्राचा हा फुगवटा असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे. एकाच शेतकऱ्यांने अनेक कारखान्याकडे ऊसाची नोंद केलेली आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याची नोंद प्रत्येक कारखान्याकडे केली असण्याची शक्यता आहे.

तसेच यंदा दुष्काळी स्थिती असल्याने यापुढील काळात ऊसाची निगा राखणे अत्यंत अवघड आहे, सगळे प्रकल्प, स्रोत बंद पडल्याने ऊसाला पाणी कसे द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अनेक ठिकाणी तर गेल्या महिन्याभरापासुन ऊसाला पाणीच मिळालेले नाही, पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऊसाच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे यंदा हंगाम लवकर संपण्याची शक्यता दिसत आहे.

कारखान्यांची भूमिका गुलदस्त्यात

दोन गूळ पावडर कारखान्यानी दोन हजार आठशे तर एकाने दोन हजार सातशे रुपये दर जाहीर केले आहे. सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन जागर परिषद देखील सुरु केली आहे, त्यांच्याकडुन साडेतीन हजार रुपयाची मागणी होत आहे. मात्र कारखान्यानी अद्याप काहीच भूमिका जाहीर केली नाही.

दर जाहीर करण्याबाबत ठराव

कळंब तालुक्यातील काही गावांनी ठराव करून दर जाहीर केल्याशिवाय ऊस देणार नसल्याचा दावा केला आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्र कमी असुन कारखान्याची संख्या यंदा वाढणार आहे, त्याशिवाय काही गुळपावडर कारखान्यानी नव्याने गाळप करणार असल्याचे जाहीर केले आहे.

दुष्काळसदृश स्थितीचे आव्हान

गेल्या तीन चार वर्षात सातत्याने चांगला पाऊस झाल्याने ऊस क्षेत्रात कमालीची वाढ झाली होती. आता दुष्काळसदृश स्थिती असल्याने कारखानदारीसमोर मोठ आव्हान उभे राहिले आहे, साहजिक अशावेळी शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगली मागणी मिळणार आहे. अधिकचा दर मिळण्याची शेतकऱ्यांतुन आतापासून मागणी होऊ लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT