Belgaum Sugar Factories FRP : महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २०२३ -२४ गळीत हंगामासाठी उसाला प्रतिटन एफआरपीप्रमाणे घोषित केला. यामध्ये सौंदत्ती तालुक्यातील रेणुका साखर कारखान्याकडून सर्वाधिक ३ हजार ७७३ रुपये दर जाहीर करून अव्वल स्थानावर आहे.
त्यानंतर बेडकिहाळ (ता. चिक्कोडी) येथील वेंकटेश्वर पॉवर प्रोजेक्ट लिमिटेडतर्फे ३ हजार ६९३ रुपये दर घोषित करण्यात आला आहे. बेडकिहाळ साखर कारखाना हा कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या मालकीचा आहे.
दरम्यान बेळगाव जिल्ह्यातील कारखान्यांनी जवळपास ३ हजार ५०० च्यावर दर दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. साखर कारखान्यांनी जाहीर केलेला दर तोडणी वाहतूक वजा करून आहे की नाही याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. नीतेश पाटील यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकान्वये कळविले की, कारखाने सुरू करण्यापूर्वी एफआरपीचे दर साखर कारखान्यांनी घोषित करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार २७ साखर कारखान्यांनी एफआरपी घोषित केली आहे. चिक्कोडी तालुक्यात सर्वाधिक दर बेडकीहाळ येथील वेंकटेश्वर साखर कारखान्याकडून घोषित करण्यात आला आहे.
बेळगाव शुगर्स प्रा.लि. हुदली - रु.३६५७, दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखाना, चिकोडी - रु. ३५८६, धनलक्ष्मी सहकारी साखर कारखाना, रामदुर्ग - रु.३६५७, घटप्रभा सहकारी साखर कारखाना, संगनकेरी (ता. गोकाक) - रु.३३४६, गोकाक शुगर्स, कोळवी (ता. गोकाक ) - रु. ३६४१, हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखाना, निपाणी - रु. ३६११हर्षा शुगर्स लि. सौदत्ती - रु.३३७१.
हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना, संकेश्वर - रु. ३४८८, कृष्णा साखर कारखाना, संकोनट्टी (ता. अथणी)* - रु. ३५२८, लैला शुगर्स लि. खानापूर - रु.३३९६, मलप्रभा सहकारी कारखाना, एम.के. हुबळी (ता. बैलहोंगल) - रु.३१६५, रेणुका शुगर्स लि. रायबाग - रु.३४४८, रेणुका शुगर्स लि. बुट्टी (ता. अथणी) - रु.३५३४, रेणुका शुगर्स मुन्नोळी (ता. सौदत्ती) - रु.३७७३, सतीश शुगर्स, हुनशाळ (ता. गोकाक ) - रु. ३६३५.
संगम साखर कारखाना, हिडलक डॅम (ता. हुक्केरी) - रु.३५८९, शिरगुप्पी शुगर्स लि. कागवाड. - रु.३४९१, शिवशक्ती शुगर्स लि. बुवाची सौदत्ती (ता. रायबाग) - रु.३६२३, शिवसागर शुगर्स - ॲग्रो प्रा.लि. उदपुडी (ता. रामदुर्ग) - रु. ३४५८, सोमेश्वर साखर कारखाना, बैलहोंगल - रु.३६५७, सौभाग्यलक्ष्मी सहकारी कारखाना हिरेनंदी (ता. गोकाक ) - रु.३०८९.
दि डेय साखर कारखाना, नि. काकती - रु.३४७५, दि उगार शुगर्स वर्क्स लि. उगार खुर्द - रु. ३५६४, वेंकटेश्वर पॉवर प्रोजेक्ट लि. बेडकिहाळ (ता. चिकोडी ) - रु.३६९३, विश्वराज शुगर्स इंडस्ट्रिज लि. बेल्लद बागेवाडी - रु.३६३२, अरिहंत शुगर्स इंडस्ट्रिज जैनापूर (ता. चिकोडी) - रु.३६०१, अथणी शुगर्स प्रा.लि., अथणी - रु.३५१८.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.