Kolhapur Water Crisis
Kolhapur Water Crisis agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Water Crisis : नदीपात्रातील पाणी संपल्याने शेतातील पिके जगवायची कशी? पात्र वारंवार पडताहेत कोरडी

sandeep Shirguppe

Drought Condition Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पुरेसे पाणी असल्याचे बोलले जात आहे परंतु जिल्ह्यातील दोन्ही धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडले जात असल्याने अनेक ठिकाणी नदी पात्र कोरड पडत असल्याचे चित्र आहे. दरम्यान शिरोळ तालुक्यात हे चित्र सर्वाधिक पहायला मिळत आहे. दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यात तब्बल तिसऱ्यांदा कोरडे पडले आहे.

शिरोळ तालुक्यातील दत्तवाडसह घोसरवाड, नवे व जुने दानवाड, टाकळीवाडी आदी गावांचा शेतीचा व पिण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वीच दूधगंगा नदी पात्रात पाणी आले होते.

सद्यः स्थितीत उन्हाचा तडाका वाढल्याने पाण्याची गरजही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे क्रमपाळीनुसार पाण्याचे नंबर येण्यापूर्वीच नदीपात्रातील पाणी संपल्याने शेतातील पिके जगवायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पिण्याच्या व इतर घरगुती कामासाठीच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी या परिसरातील नागरिकांना विहिरी, कूपनलिका व बोरवेल्सचा आधार घ्यावा लागत आहे.

मात्र, वारंवार नदीपत्रात पाणी संपू लागल्याने विहिरी व बोरवेल्समधील पाण्याची पातळीही कमी होऊ लागली आहे. मार्च महिन्यातच ही परिस्थिती तर पुढील एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांत काय परिस्थिती होईल, याची भीती नागरिक व शेतकऱ्यांना चिंताग्रस्त करीत आहे.

गेल्यावर्षीही दुधगंगा नदीपात्र तब्बल दहा वेळा कोरडे पडले होते. त्यावेळी गावातील बहुतांश विहिरींनी तळ गाठले होते. तर निम्म्याहून अधिक गावातील कुपनलिका जमिनीतील पाण्याअभावी बंद पडले होते. पाण्याची गरज भागवण्यासाठी ग्रामपंचायतीला चक्क नदीपात्रात बोअर मारावे लागले होते.

दत्तवाड येथील दत्तवाड-मलिकवाड व दत्तवाड-एकसंबा या बंधाऱ्यावरील बरगे जीर्ण झाल्याने पाटबंधारे खात्याने तत्काळ या बंधाऱ्यावरील बरगे नवीन व अधिक उंचीचे बसवणे गरजेचे आहे. दत्तवाड हे दूधगंगा नदीवरील महाराष्ट्रातील शेवटचे गाव असल्याने पाणी अडवण्यासाठी येथे भक्कम व्यवस्था होणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yojana Doot Bharti : 'योजनादूत'साठी पात्रता काय, अर्ज कुठं करायचा ?

Agristack Project : जमीन विक्रीच्या व्यवहारांमध्ये अडथळे होणार दूर; राज्यात राबवला जाणार 'अॅग्रिस्टॅक' प्रकल्प

Shivraj Singh Chouhan| देशातील नव्या स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणार: शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

Nanded Heavy Rain : नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे पशुधन दगावले

Land Compensation : धरणग्रस्तांवर आर्थिक संकट

SCROLL FOR NEXT