Sugarcane Seedlings Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Seedlings : गादी वाफ्यावर ऊस रोपे कशी तयार करावीत?

Sugarcane Cultivation : कांडी लागण पद्धतीपेक्षा ऊस रोपांची लागवड जास्त फायदेशीर ठरते. कारण या पद्धतीने बियाणे आणि निविष्ठांच्या खर्चात बचत होते याशिवाय ऊस उत्पादनात ही वाढ मिळते.

Team Agrowon

Sugarcane Farming : कोणत्याही पिकाची उत्पादकता ही शुद्ध बिजावर अवलंबून असते. तसंच ऊस पिकाचही आहे. बरेच शेतकरी वर्षानुवर्ष एकाच जातीच उस बेण लागवडीसाठी वापरतात. बेणे न बदलल्यास ऊस जातीचे काही मूळ गुणधर्म बदलतात. उत्पादन क्षमता कीड व रोग प्रतिकार शक्ती कमी होऊन उत्पादनात घट येते. याकरिता किमान दोन ते चार वर्षातून एकदा बेणे बदलण आवश्यक आहे.

बरेच शेतकरी उसाची लागवड कांडी पद्धतीने करतात.  कांडी लागण पद्धत ही ऊस लागवडीची प्रचलित पद्धत आहे. या पद्धतीन बेणे उसाची जाडी कमी मिळत असली तरी या बेण्याची उगवण ८५ ते ९५ टक्के मिळते. कांडी लागण पद्धतीपेक्षा ऊस रोपांची लागवड जास्त फायदेशीर ठरते. कारण या पद्धतीने बियाणे आणि निविष्ठांच्या खर्चात बचत होते याशिवाय ऊस उत्पादनात ही वाढ मिळते.  

ऊस रोपे स्वत:च्या शेतात अगदी शास्त्रिय पद्धतीने तयार करता येतात.  गादी वाफा रोप पद्धत, प्लॅस्टीक पिशवीतील रोप पद्धत, प्लॅस्टीक प्रो-ट्रे रोप पद्धत आणि एक डोळा चकती पद्धत या ऊस रोपे तयार करण्याच्या चार पद्धती आहेत.

यापैकी गादी वाफ्यावर ऊस रोपे कशी तयार करायची याची पुणे जिल्ह्यातील मांजरी (बु.) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ने दिलेली  माहिती पाहुया. 

गादी वाफ्यावर ऊस रोपे तयार करण्याची पद्धत

गादी वाफा रोप पद्धतीत १ मीटर रुंद आणि १० मिटर लांब वाफे तयार करावेत. गादी वाफे तयार करताना तळाशी प्लॅस्टिक पेपर किंवा खतांच्या रिकाम्या पिशव्या अंथराव्यात. त्यावर चांगले कुजलेले शेणखत आणि मातीच्या मिश्रणाचा सहा इंच जाडीचा थर तयार करावा. यामध्ये दोन इंच आकाराच्या उसाच्या एक डोळा कांड्यांची मांडणी करावी. 

दोन कांड्यातील अंतर एक ते दोन इंच आणि दोन ओळीतील अंतर एक इंच ठेवावे. कांड्याची मांडणी करण्यापुर्वी कांड्याला बुरशीनाशक आणि किटकनाशकाची बेणे प्रक्रिया करावी.  मांडणी केलेल्या कांड्यावर दोन इंच मातीचा थर द्यावा. अशा पद्धतीने तयार केलेली रोपे ३० ते ३५ दिवसात लागवडीसाठी तयार होतात. 

जास्त वयाच्या रोपांची लागवड केल्यास त्याचा फुटव्यांवर परिणाम होतो. अर्धा गुंठा म्हणजेच ५० चौरस मिटर क्षेत्रावर केलेली रोपे एक हेक्टर क्षेत्रासाठी पुरतात. रोपांची लागवड करताना गादी वाफ्याला पाणी देऊन रोपे काढावीत. 

रोपाच्या मुळ्या तुटत नाहीत आणि रोपे सुकतही नाहीत. काढलेल्या रोपांची लागवड लवकरात लवकर करावी त्यामुळे रोपांची मर होण्याच प्रामाण कमी होतं. या पद्धतीने बेण्यावर होणारा खर्चही कमी होतो आणि वाहतुकीचा खर्च वाचतो. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Harvesting : भातकापणीच्या कामात बळीराजा व्‍यग्र

Farmer Aid : अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे भाजीपाला उत्पादक संकटात

ZP Panchayat Samiti Election : कार्यकर्त्यांना संधी मिळणार! जिल्हा परिषदेत ५ आणि पंचायत समितीमध्ये २ स्वीकृत सदस्य नेमणार?

Agriculture Department Land : तासगावातील ‘कृषी’ची जागा द्राक्ष संघास भाडे कराराने द्यावी

SCROLL FOR NEXT