Team Agrowon
गूळ पावडर तयार करताना कल्हईच तयार केलेला पातळ गूळ साच्यात न भरता वाफ्यातच थंड केला जातो.
गूळ वाफ्यात घट्ट होण्यापूर्वीच दाताळल्याने उभ्या व आडव्या रेघा मारून हलवून घेऊन गुळाचे लहान तुकडे केले जातात.
गुळाचे हे तुकडे वाफ्यात घट्ट झाल्यानंतर सूर्यप्रकाशात कापडाच्या आवरणाखाली ठेवून वाळवतात.
वाळलेला गूळ लाकडी बडव्याने बारीक करुन वेगवेगळ्या चाळण्यातून चाळला जातो.
चाळलेल्या गुळाची पावडर दोन ते तीन दिवस वाळवून त्यातील आद्रतेच प्रमाण कमी केल जातं.
पावडरच्या आकाराच्या वर्गवारीनुसार पॉलिथिनच्या आकर्षक पीशव्यांतून गूळ पावडरीच पॅकिंग केल जात.