How to make a solar dryer at home
How to make a solar dryer at home  Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Dryer : घरच्या घरी कसे बनवायचे सोलर ड्रायर

Team Agrowon

बदलत्या काळानुसार जास्तीत जास्त प्रमाणात सौर ऊर्जेचा (Solar Energy) वापर करणे आवश्यक आहे. शेतीमाल वाळविण्यासाठी (Farm Produce Drying) सौर ऊर्जेचा वापर केल्यास स्वच्छ, धूळ विरहित सुकलेला व उच्च प्रतीचा शेतीमाल आपणास मिळू शकतो.  अत्यंत कमी जागेत फळे, भाज्या, औषधी वनस्पती, घरगुती वाळवणे, धान्य इ. पदार्थ उन्हात वाळविण्यासाठी पुणे येथील अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलजी इन्स्टिट्यूट (आरती) संस्थेने बांबूचे सौर वाळवण यंत्र म्हणजेच सोलर ड्रायर (Solar Dryer) तयार केले आहे. यामध्ये वाळविण्यास ठेवलेल्या पदार्थाला आहे तसा रंग राहतो. फक्त त्यातले पाणी निघून जाते. ज्यावेळी फळे व भाज्या स्वस्त असतील त्यावेळी या संयंत्रात वाळवून ठेवल्यास त्याचा पुन्हा केव्हाही वापर करता येतो. असे वाळविलेले पदार्थ वर्षभर चांगले राहतात. 

सोलर ड्रायर ची रचना

हे यंत्र पिरॅमीड आकाराचे आहे. या संयंत्रातील कप्प्यांवर पांढरे स्वच्छ कापड घालून त्यावर पदार्थ वाळविण्यास ठेवावे. खालून वर या क्रमाने एक एक कप्पा जोडत यावे. 

सर्व कप्पे जोडून त्यात वाळवण ठेवून झाले की संयंत्रावर प्लॅस्टिकचे कव्हर घालावे. ज्या पदार्थात पाण्याचे प्रमाण कमी आहे, असे पदार्थ खालच्या ट्रेमध्ये ठेवावेत (उदा. पालेभाज्या कांदा इ.). ज्या पदार्थात पाण्याचे प्रमाण जास्त असेल असे पदार्थ वरच्या ट्रेमध्ये ठेवावेत. (उदा. द्राक्ष, केळी, फळांच्या फोडी). 

हे सौर वाळवण यंत्र मुद्दाम पिरॅमिडच्या आकाराचे तयार केले असल्यामुळे या यंत्रावर दिवसभर ऊन पडते. या यंत्रवार घातलेल्या काळ्या प्लॅस्टिकच्या कव्हरमुळे बाहेरील धूळ, केरकचरा, माशा, पक्षी यापासून पदार्थाचे संरक्षण होते.

प्लॅस्टिकच्या कव्हरला खाली लावलेल्या जाळीमधून बाहेरील हवा आत जाते व कव्हरच्या वरील टोकाला लावलेल्या छोट्या जाळीमधून ड्रायरमधील गरम झालेली हवा बाहेर पडते.

या वाळवण यंत्राला खाली लावलेल्या प्लॅस्टिकच्या कागदामुळे खालून धूर, कचरा व किडे त्यात जात नाहीत. एकावर एक अशा कप्प्यांच्या रचनेमुळे या वाळवण यंत्रात कमी जागेत अधिक माल वाळविता येतो. 

वाळवणाचे काम संपल्यानंतर हे यंत्र घडी करुन घरात ठेवता येते. 

मसाल्याचे पदार्थ करणाऱ्या तसेच आयुर्वेदिक औषधी तयार करणाऱ्या कारखान्यात या वाळवण संयंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पावसाळा सोडून इतर हंगामात या यंत्राचा वापर करता येतो. 

---------------

स्त्रोत ः पुस्तिका- अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट (आरती) ने विकसित केलेली तंत्रे 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT