Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabbi Jowar : रब्बी ज्वारीसाठी जमिनीतील ओलावा कसा टिकवाल?

Jowar Sowing : रब्बी ज्वारी पेरणी ही प्रामुख्याने जमिनीतील ओलाव्यावर केली जाते. पिकांच्या संवेदनशील अवस्था ओळखून त्या अवस्थेमध्ये पाण्याचे नियोजन करावे.

Team Agrowon

Jowar Moisture Conservation : यंदा पाऊस कमी झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी कमी पडण्याची शक्यता आहे. ज्वारी हे रब्बी हंगामातील महत्वाच पीक आहे. रब्बी ज्वारी पेरणी ही प्रामुख्याने जमिनीतील ओलाव्यावर केली जाते. पिकांच्या संवेदनशील अवस्था ओळखून त्या अवस्थेमध्ये पाण्याचे नियोजन करावे.

त्यातून चांगली उत्पादन वाढ मिळू शकते. उत्तम उत्पादनासाठी ज्वारी पिकाला संरक्षित पाणी देण्याची आवश्यकता असते. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याच्या प्रमाणानुसार खालील संवेदनशील अवस्थांमध्ये सिंचनाचे नियोजन करावे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१) कोळपणी

पहिली कोळपणी ः पेरणीनंतर तीन आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी.

दुसरी कोळपणी ः पेरणीनंतर पाच आठवड्यांनी पासाच्या कोळप्याने करावी.

तिसरी कोळपणी ः पेरणीनंतर आठ आठवड्यांनी दातेरी कोळप्याने करावी.

कोळपणी वेळी कोळप्याला दोरी बांधल्यास, पिकांच्या मुळांना मातीची भर दिली जाते. तसेच शेतात सऱ्या पाडून पावसाचे पाणी धरून ठेवण्यास मदत होते.

२) विरळणी ः पेरणीनंतर १० ते १५ दिवसांनी विरळणी करून रोपांची संख्या हेक्टरी १.४८ लाख इतकी ठेवावी.

३) तणनियंत्रण ः पिकाच्या सुरुवातीच्या ३५ ते ४० दिवसांत पीक तणविरहित ठेवावे. आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा खुरपणी आणि तीन वेळा कोळपणी करावी.

४) सिंचन व्यवस्थापन

पाणी उपलब्ध असल्यास पिकास ३० ते ३५ दिवसांनी पहिले पाणी (गर्भ अवस्थेत), दुसरे पाणी ५० ते ५५ दिवसांनी पीक पोटरीत अवस्थेत, तिसरे पाणी ७० ते ७५ दिवसांनी पीक फुलोऱ्यात आणि चौथे पाणी ९० ते ९५ दिवसांनी (चिकात असताना) द्यावे. जर फक्त दोन पाणी देणे शक्य असल्यास, पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी व ५५ दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे.

--------------

स्त्रोत- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity: नाशिक जिल्ह्यात १०८४ गावांमध्ये संभाव्य टंचाई

Local Body Elections: रत्नागिरी,सिंधुदुर्गात उमेदवारांपेक्षा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Leopard Sightings: बिबट्याच्या त्रासाने शेतकरी हैराण

Local Body Elections: कोल्हापुरात वैयक्तिक गाठीभेटींना प्राधान्य

Agriculture Festival: ‘कृषिपर्व’ महोत्सवात एआय वर विशेष मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT