Drought Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : नव्वद लाख पशुधन जगवायचे कसे ?

Team Agrowon

Pune News : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्यासह चाऱ्याचा दुष्काळ निर्माण झाला आहे. परिणामी, चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतीसह पशुधनदेखील धोक्यात आले आहे. चारा-पाण्याचे नियोजन करण्यासाठी पशुपालकांबरोबरच सरकारची तारेवरची कसरत होत आहे. आचारसंहितेमुळे धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. तर चारा आणि पाणीटंचाईमुळे सुमारे ९० लाख पशुधनाच्या संगोपनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

२०१९ च्या पशुगणनेनुसार, राज्यात सुमारे ९० लाख दुभत्या गायी म्हशी आहेत. यामध्ये संकरित गायींची संख्या २८ लाख ३१ हजार २९१, देशी गोवंश सुमारे २७ लाख ९१ हजार २३६ आणि म्हशींची संख्या सुमारे ३२ लाख ८१ हजार ६५७ एवढी आहे. चारा आणि पाण्यावाचून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने चाऱ्याचे नियोजन केले होते. यामध्ये चाऱ्यासाठी २०२३-२४ साठी १० कोटी ८६ लाख रुपयांची तरतूद केली होती. हा निधी २०२३ मध्ये वाटप झाला. २०२४ मध्ये यामध्ये वाढ करून फेब्रुवारीमध्ये २० कोटी ८६ लाखांची तरतूद करण्यात आली. या दोन्ही निधींचा एकत्रित खर्च ३९ कोटी ८८ लाख करून १२ हजार ६३६ क्विंटल वैरण बियाण्यांचे वितरण केल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे देण्यात आली. वैरण बियाण्यांद्वारे राज्यात ४२ हजार हेक्टर वर वैरण पिकांची लागवड होऊन, २० लाख ९३ हजार हिरव्या चाऱ्याचे उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. याद्वारे किती चारा उपलब्ध झाला, हा प्रश्‍न आहे.

दरम्यान, कृषी विभागाच्या रब्बी हंगामाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार यंदा राज्यात रब्बी ज्वारी १६ लाख १७ हजार ९९२ हेक्टर म्हणजेच सरासरीच्या ९२ टक्के लागवड झाली आहे. मात्र उन्हाळी परिस्थितीमुळे ज्वारीच्या कडब्याच्या उत्पादनात घट झाल्याने दर गगनाला भिडले आहेत. ज्वारी उत्पादक गणपत डुंबरे (पांगरीमाथा, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी ३ एकरांवर ज्वारीची लागवड केली होती. सध्या ज्वारी काढणी सुरू असून, निम्म्याने उत्पादन घटल्याचे त्यांनी सांगितले. तर कडब्याच्या एका पेंडीला ३५ ते ४५ रुपये दर असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्वारी बरोबरच मक्याची लागवड ३ लाख ४० हजार ८१० हेक्टर सरासरीच्या १३२ टक्के, इतर रब्बी तृणधान्य १० हजार ४०७ हेक्टर (सरासरीच्या ९२ टक्के), अशी एकूण ३० लाख ९ हजार ५२४ हेक्टर (सरासरीच्या ९८ टक्के) पिकांची पेरणी झालेली आहे. मात्र पाऊस आणि उपलब्ध पाण्यामुळे चारा पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे.

अमेरिकेतून चारा आयातीची वेळ

पुणे जिल्ह्यातील एका दुग्ध उत्पादन उद्योग समूहाने अमेरिकेतून २०० टन चारा आयात केला आहे. या चाऱ्यामुळे दररोज दूध उत्पादनाच्या वाढीवर अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर भारत व अमेरिका या दोन देशांमध्ये सामंजस्य करार झाल्यानंतर देशातील दूध उत्पादकांना माफक दरात चारा पुरविण्याचे नियोजन आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT