Sugarcane Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Management : खोडवा उसाच उत्पादन कसं वाढवायच?

Sugarcane Production : महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटन्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाच कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे.

Team Agrowon

Sugarcane Crop : देशात ऊस गळीत हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या वर्षी उसाच उत्पादन घटून साखर उत्पादनही कमी राहण्याचे भाकित केल जात होते.

महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटन्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाच कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे.  उसाचे सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी खोडवा ठेवताना कोणती काळजी घ्यायची?

राज्यातील एकूण क्षेत्रापैकी ३५ ते ४० टक्के खोडव्याचे क्षेत्र असूनही एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा फक्त ३० ते ३५ टक्के इतकाच आहे. म्हणून  लागणीच्या उसाप्रमाणेच खोडव्याचे उत्तम व्यवस्थापन केले पाहिजे. त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवावा. त्यानंतर घेतलेल्या खोडवा उसावर खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.

ज्या ऊस लागवडीच्या उसाचे उत्पादन हेक्टरी १०० टन आणि उससंख्या एक लाखापेक्षा जास्त आहे अशा उसाचाच खोडवा ठेवावा. ऊस पिक विरळ झाल्यास ४५ सेंटीमीटर पेक्षा जास्त अंतरावरील नांग्या भरण्यासाठी प्लास्टिकच्या ट्रेमध्ये तयार केलेली किंवा ऊस रोपवाटिकेतील रोपे दुसऱ्या पाण्याच्या वेळी लावावीत.

खोडवा ठेवायची जमीन सुपीक आणि निचऱ्याची असावी. खोडवा पीक १२ ते १४ महिने वयाचे असताना उसाची तोड होणार असेल तरच खोडवा ठेवावा. शिफारस केलेल्या ऊस जातीचाच खोडवा ठेवावा.

खोडवा नेमका कोणत्या वेळी राखायचा ?

उसाची तोडणी ऑक्टोबर पासून एप्रिल - मे पर्यंत केली जाते. या उसाचा खोडवा ठेवला जातो. जसजसा खोडवा राखण्यासाठी उशीर होतो तसतसे खोडव्याचे उत्पादनही कमी होत जाते. म्हणून १५ फेब्रुवारी नंतर तोडलेल्या उसाचा खोडवा ठेवू नये.  

संशोधनानुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास जास्त उत्पादन मिळत.  पूर्व हंगामी उसापासून ठेवलेला खोडव्याच जास्त उत्पादन मिळत.

खोडवा ठेवताना कोणती काळजी घ्यायची?

खोडवा ठेवताना पाचट जाळू नये.  पाचट शेताबाहेर न काढता एक आड एक सरीतही ठेवू नये. याशिवाय तोडलेल्या उसाच्या बुडख्यांवर पाचट ठेवू नये. खोडावा उसाला रासायनिक खते फेकून देऊ नयेत.  आंतरमशागत व मोठी बांधणी करणे,  

बगला फोडण, जारवा तोडण ही कामे करणही टाळाव. तसेच पाण्याचा अतिवापर ही करायचा नाहीए. खोडवा ठेवताना अशी काळजी घेतली तरच खोडवा उसापासूनही चांगल उत्पादन मिळत.   

माहिती आणि संशोधन - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavistar Ai App: ‘कृषी’कडून शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ ॲप

California Import Ban: कॅलिफोर्नियातून आलेले कंटेनर पाठवले परत

Crop Loan: कर्जदार ९४ हजार शेतकऱ्यांना परतफेडीची चिंता

Farmer Protest: ‘शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या’

Sugar Commissioner: राज्याच्या साखर आयुक्तपदी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT