Sugarcane Management : ऊस खोडवा व्यवस्थापनाचे तंत्र

ऊस तोडणी केल्यानंतर नवीन येणारे फुटवे पिवळे किंवा केवडा पडल्यासारखे दिसतात अशा ठिकाणी माती परिक्षण करावे.
Sugarcane Management
Sugarcane ManagementAgrowon

खोडवा उसाची (Sugarcane ) चांगली फूट आणि वाढ होण्यासाठी रासायनिक खतांचा (Fertilizer) पहिला हप्ता आणि हलके पाणी महत्त्वाचे असते. खोडव्याला पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वापसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली मात्रा द्यावी.

Sugarcane Management
Sugar Cane Factory : ‘श्री संत एकनाथ घायाळ शुगर’चा गळीत हंगाम प्रारंभ

खत देण्याची पद्धत ः
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी शिफारस केल्याप्रमाणे पहारीसारख्या साधनाच्या साहाय्याने वापसा असताना खड्डे घ्यावेत. खताची मात्रा दोन समान हप्त्यात द्यावी. पहिली अर्धी खत मात्रा लागणीचा ऊस तुटल्यानंतर १५ दिवसाने सरीच्या एका बाजूला बुडख्यापासून अर्धा फूट अंतरावर आणि खोलीवर, दोन खड्डयात एक फूट अंतर ठेवून खते पहारीच्या सहाय्याने खड्डा घेऊन झाकून द्यावीत. खताचा दुसरा हप्ता सरीच्या दुसऱ्या बाजूने त्याच पद्धतीने ४.५ महिन्यांनी द्यावा. खत दिल्यानंतर हलके पाणी द्यावे.

फायदे ः
१) खत मुळांच्या सानिध्यात दिले जाते, त्यामुळे ते पिकास त्वरित उपलब्ध होते. दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्याने ते वाया जात नाही. खत खोलवर व झाकून दिल्यामुळे वाहून जात नाही. या पद्धतीने तणांचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. तणांवाटे घेतल्या जाणाऱ्या रासायनिक खतांचे प्रमाण कमी राहते. जास्तीत जास्त खत मुख्य पिकास मिळते.

Sugarcane Management
Sugar Cane Management : उसासाठी पाणी व्यवस्थापन तंत्र

२) रासायनिक खतांची पिकांच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्धता होऊन खतांची कार्यक्षमता वाढते. जोमदार वाढ होऊन उसाचे भरघोस उत्पादन मिळते. सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणे शक्य होते, त्यामुळे सर्वत्र सारख्या उंचीचे व जाडीचे पीक आल्यामुळे ऊस उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होते.

३) खोडव्यामध्ये पाचट ठेवून पहारीने खत देण्याच्या पद्धतीने खोडव्याचे व्यवस्थापन केल्यास नेहमीच्या पाचट जाळणे, बगला फोडणे, आंतरमशागत, बांधणी करणे या पध्दतीपेक्षा १५ टन जादा ऊस उत्पादन मिळते.

पीक व्यवस्थापन ः
१) खोडवा व्यवस्थापन पद्धतीत कोणत्याही प्रकारची अंतर मशागत करण्याची गरज नाही. म्हणजेच जारवा तोडण्याची किंवा बगला फोडून पिकाला भर देण्याची गरज नाही.
२) पाचटामुळे पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर ८ ते १० दिवसांवरून १५ ते २० दिवसापर्यंत वाढविता येते. खोडवा व्यवस्थापनासाठी नवीन तंत्रामध्ये १३ ते १४ पाण्याच्या पाळ्या असल्या तरी उत्पादन चांगले मिळते.

Sugarcane Management
Sugar To Ethanol : केंद्र शासनाने दिली मान्यता | ॲग्रोवन

उन्हाळ्यामध्ये ३० ते ३५ दिवस पाणी नसले तरी पीक तग धरु शकते. ठिबक सिंचनाचा वापर केल्यास खोडव्याचे पाणी व्यवस्थापन फायदेशीर ठरते.
३) ठिबक सिंचनातून ८० टक्के विद्राव्य खत प्रत्येक आठवड्यातून एकदा या प्रमाणे २६ हप्त्यात दिल्याने उत्पादनात २८ टक्क्यांनी वाढ होऊन २० टक्के खतांच्या मात्रेत बचत होते.

सूक्ष्म अन्नद्रव्य आणि जिवाणू खतांचा वापर ः
१) ऊस तोडणी केल्यानंतर नवीन येणारे फुटवे पिवळे किंवा केवडा पडल्यासारखे दिसतात अशा ठिकाणी माती परिक्षण करावे. त्यानुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता असल्यास हेक्टरी २० किलो झिंक सल्फेट, २५ किलो फेरस सल्फेट, १० किलो मँगेनीज सल्फेट आणि
५ किलो बोरॅक्स ही खते वापरावीत.

अ‍ॅझोटोबॅक्टर, अ‍ॅसिटोबॅक्टर, अ‍ॅझोस्पिरिलम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक प्रत्येकी १.२५ किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात एकूण ५ किलो जिवाणू खतांचा वापर केल्यास नत्र आणि स्फुरदाच्या मात्रा २५ टक्क्यांनी कमी कराव्यात.
२) खोडवा ठेवल्यानंतर दोन महिन्यांनी हेक्टरी १ लिटर द्रवरूप अ‍ॅसेटोबॅक्टर जिवाणू संवर्धन ५०० लिटर पाण्यात मिसळून सकाळच्या वेळेस पिकावर फवारणी करावी. १.२५ किलो स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक १०० किलो कंपोस्ट खतात मिसळून सरीमधून द्यावे.
संपर्क ः
डॉ. भरत रासकर, ८७८८१०१३६७
(ऊस विशेषज्ञ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि.सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com