Kolhapur Flood agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Flood : कोयना, अलमट्टी, राधानगरी, दुधगंगा धरणातून विसर्ग किती? कोल्हापुरला महापुराचा धोका कायम

Pachanganga River Flood : काळम्मावाडी, कोयना, राधानगरी आणि वारणेतून विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा आणि कृष्णानदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Rain Heavy Flood : मागच्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी काही तास उसंत घेतली. परंतु दुपारपासून पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा विळखा अद्याप कायम आहे. राधानगरी धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी ४६ फुटांकडे वाटचाल करत आहे. तर कोल्हापूर शहरात पाणी शिरत असल्याने नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे.

काळम्मावाडी, कोयना, राधानगरी आणि वारणेतून विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा आणि कृष्णानदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

जिल्ह्यातील ९५ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात ८.३६ टीएमसी पाणीसाठा आहे. तर पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक १,३, ४,५, असे एकूण ४ दरवाजे खुले आहेत. सध्या धरणातून ७ हजार १६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर तुळशी, पाटगाव, कडवी धरणेही पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

काळम्मावाडी धरणातून विसर्ग वाढवला

दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून सुरू असलेला विसर्गामध्ये वाढ करण्यात आली. आज (दि.२६) सकाळी १० वाजता ४ हजार घनफूट प्रतिसेकंद (क्यूसेक्स) पाणी सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सोडण्यात आले. आवशकयतेनुसार विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविणेत येणार आहे. दूधगंगा नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ झाल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत आला. दरम्यान दुधगंगा धरणाला गळती असल्याने किती टीएमसी पाणीसाठी ठेवायचा याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही.

११ राज्य मार्ग व ३७ प्रमुख जिल्हा मार्ग बंद

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ११ राज्य मार्ग व ३७ प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण ४८ मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील वाहतूक विस्कळीत झाल्याने दूध वाहतूकही बंद झाली आहे यामुळे जिल्हा दूध संघ (गोकुळ)लाही हजारो लिटर दूध बंद झाल्याने फटका बसत आहे. काही ठिकाणी शेतात पाणी आल्याने भाजीपाला कुजून गेला आहे.

‘आलमट्टी’तून पावणे तीन लाखांचा विसर्ग

सध्या कर्नाटक व महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या आलमट्टी धरणातून गुरूवारी दुपारी विक्रमी पावणे तीन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पावसामुळे येणारे अधिक पाणी आणि महाराष्ट्राकडून झालेल्या विनंतीनुसार ही कार्यवाही केली आहे. रात्री उशिरा विसर्ग तीन लाख करण्यात येणार होता. पण आदेश न आल्यामुळे निर्णय न घेतल्याचा आलमट्टी धरण प्रशासनाने सांगितले.

तीन लाख विसर्गाच्या आदेशाची प्रतीक्षा

आलमट्टीतून यंदा विक्रमी तीन लाख क्युसेक पाणी विसर्ग करण्याचे नियोजन आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील येणारे पाणी, पाऊस, आलमट्टीतील आवक अशी माहिती घेतली होती. महाराष्ट्रानेही त्याप्रमाणे विनंती केली. सध्या रात्रीपर्यंत पाहून निर्णय घेण्याचे अधीक्षक पातळीवर ठरविण्यात आले आहे. त्यामुळे रात्रीपर्यंत विसर्ग वाढविण्याचा आदेश पोहचण्याची प्रतीक्षा आलमट्टी धरण प्रशासन करत होते.

कोयनेतून ३१ हजार ५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आज (ता.२६) शुक्रवारी दुपारी विश्रांती घेतली. पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणातील पाणी साठ्यात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे धरणातून कोयना नदीत होणारा ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग स्थिर आहे. त्यामध्ये आज दुपारी १२ वाजता करण्यात येणारी १० हजारांची वाढ पाऊस कमी झाल्याने थांबवण्यात आली आहे. त्यामुळे कृष्णा-कोयना नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोयना धरणातून पायथा वीजगृहातून सोडण्यात आलेले एक हजार ५० क्युसेक आणि धरणाच्या दरवाजातून सोडण्यात आलेले ३० हजार क्युसेक असे ३१ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग स्थिर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा- कोयना नदीकाठच्या पूरबाधित गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रामधील पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येईल, असेही धरण व्यवस्थापनाने कळवले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा टीएमसीमध्ये

राधानगरी ८.३६, तुळशी ३.१३, वारणा ३०.५२, दूधगंगा २०.३९, कासारी २.२१, कडवी २,५२, कुंभी २.१२, पाटगाव ३.५०, चिकोत्रा १.०८, चित्री १.८९, जंगमहट्टी १.२२, घटप्रभा १.५६, जांबरे ०.८२, आंबेआहोळ १.२४, सर्फनाला ०.४८ व कोदे लघु प्रकल्प ०.२१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT