Rain Update : नंदुरबारातील देहली, दरा, चिरडे प्रकल्प ओव्हरफ्लो

Water Project Overflow : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा तालुक्यातील विविध लघू, मध्यम प्रकल्प पूर्ण भरले आहेत.
Water Project
Water Project Agrowon
Published on
Updated on

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा तालुक्यातील विविध लघू, मध्यम प्रकल्प पूर्ण भरले आहेत. यामुळे शेतीला पुढे पाणी उपलब्ध होणार असून, जलपुनर्भरणासही मदत होणार आहे.

शहाद्यातील उनपदेव येथील वाकी नदीतील दरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. प्रकल्पातील सांडव्यावरून पाणी प्रवाहित होऊ लागले आहे. चिरडा लघू प्रकल्पातील पाणी पातळी १२१ मिलिमीटर एवढी नोंदविण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पात पाण्याची आवक वाढली व तो १०० टक्के भरला.

Water Project
Khandesh Water Project : सातपुड्यातील लघू प्रकल्प भरू लागले

सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत असून, यामुळे परिसरातील पिंप्राळे, चिरडा, तलावडी, मडकाणी, आमोदा, फत्तेपूर आदी नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. चिरडा लघू प्रकल्प २००६ मध्ये फुटला होता. यामुळे घर-गोठ्यांसह शेतांची मोठी हानी झाली होती. अनेक जण बेघर झाले होते.

तसेच पशुधनही वाहून गेले होते. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासन दक्ष असून, गावोगावी माहिती घेतली जात आहे. तसेच ग्रामस्थांना सूचना दिल्या जात आहेत. दरा प्रकल्पातील पाणी पातळीही ३०९ मिलिमीटर एवढी आहे. हा प्रकल्पही भरून वाहू लागला आहे. वाकी नदीत पाण्याचा मोठा प्रवाह झेपावत आहे. यामुळे वाकी नदीकाठच्या विरपूर, रामपूर, फत्तेपूर, शिरूड, हवेली, कानडी, कोठली, परिवर्धा, वैजाली, नांदडे आदी गावांत दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी शहादा शहरानजीकचा सुसरी लघू प्रकल्पदेखील भरला आहे.

Water Project
Water Project Stock : कोल्हापुरातील बहुतांश लघू प्रकल्‍प भरले

देहली प्रकल्पही भरला

अक्कलकुवा तालुक्यातील देहली मध्यम प्रकल्पदेखील भरला आहे. या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पाऊस सुरूच आहे. प्रकल्पाची पाणीपातळी ९५ टक्के झाल्यानंतर प्रशासनाने लगतच्या गावांत दक्षतेचा इशारा दिला. देहली नदीत पाण्याचा प्रवाह आला आहे. रायसि्ंगपूर, अंबाबारी, रांझणी, घुनसी, लालपुरा, वल्ली, कोराई, खापर, नागरमुाथा, घोटपाडा आदी गावांमध्ये नदीत न जाण्याची सूचना देण्यात आली आहे.

सातपुड्यातील उदय नदीसही पूर आला आहे. अन्य लहान नद्या, नाल्यांनाही पूर आला आहे. तोरणमाळ (ता. धडगाव) येथील सर्व धबधबे खळाळू लागले आहेत. ते पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. विविध प्रकल्पांच्या सांडव्यावरून फेसाळणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. पर्यटकांची गर्दी होऊ लागल्याने दुर्घटना किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठीदेखील कार्यवाहीची गरज आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com