Kharif Season 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : चौतीस हजार हेक्टरवर होणार पेरणी

Kharif Season 2025 : मागील काही आठवड्यांपासून मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली होती. त्यामुळे मशागतीच्या कामात व्यत्यय आल्याने शेतीची कामे रखडली होती.

Team Agrowon

Nanded News : मागील काही आठवड्यांपासून मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली होती. त्यामुळे मशागतीच्या कामात व्यत्यय आल्याने शेतीची कामे रखडली होती. मात्र, आता हवामानात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे

माहूर तालुक्यातील चार महसूल मंडळांत ३४ हजार ५६ हेक्टरवर खरीप हंगामाचा पेरा होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५१ हजार ६२५.६९ हेक्टर असून पेरणीयोग्य क्षेत्र ३४ हजार ४०१.७३ हेक्टर आहे.

तालुक्यातील चार महसूल मंडळांपैकी माहूर मंडळाचे भौगोलिक क्षेत्र १३ हजार ७१२.९९ हेक्टर असून, पेरणीयोग्य क्षेत्र ८ हजार १२७.४० हेक्टर आहे. वाईबाजार मंडळाचे भौगोलिक क्षेत्र ९ हजार ७१.४६ हेक्टर असून पेरणीयोग्य क्षेत्र ७ हजार ९८९.९३ हेक्टर आहे.

वानोळा मंडळाचे भौगोलिक क्षेत्र १६ हजार २७४.३८ हेक्टर असून, पेरणीयोग्य क्षेत्र ८ हजार ७००.६५ हेक्टर आहे. सिंदखेड मंडळाचे भौगोलिक क्षेत्र १२ हजार ५६६.६९ हेक्टर, तर पेरणीयोग्य क्षेत्र ९ हजार ५८३.७५ हेक्टर आहे.

बोगस बियाणांपासून सावधान

दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारात बोगस बियाणांचे आगमन झाल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत आणि मान्यताप्राप्त वितरकांकडून बियाण्यांची खरेदी करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे.

सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता

यावर्षी ज्वारी ४०० हेक्टर, तूर ३ हजार ६८३ हेक्टर, उडीद ३६१ हेक्टर, मूग ३८६ हेक्टर, सोयाबीन १० हजार २२४ हेक्टर, कापूस १८ हजार २५५ हेक्टर, हळद ४२३ हेक्टर आणि इतर पिकांचा ३६४ हेक्टर, असा एकूण ३४ हजार ५६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाचा पेरा होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT