Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Kharif Sowing : पारोळ्यात ३२ हजार हेक्टर क्षेत्रात कोरडवाहू पिके पेरणीची प्रतीक्षा

Dryland Farming : मागील हंगामा जूनच्या पहिल्याच आठवड्यात किंवा ६ - ७ जूननंतर अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस झाला होता.
Published on

Jalgaon News : मागील हंगामा जूनच्या पहिल्याच आठवड्यात किंवा ६ - ७ जूननंतर अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस झाला होता. परंतु यंदा अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस नाही. त्यात कोरडवाहू क्षेत्रांत पेरणीची प्रतीक्षा आहे.

खानदेशात चाळीसगाव, पारोळा, बोदवड, अमळनेर, धुळ्यातील शिंदखेडा, नंदुरबारातील नंदुरबार आदी भाग आवर्षणप्रवण मानला जातो. या भागात बागायती क्षेत्र कमी आहे. त्यात बागायती क्षेत्रात पेरणी सुरू आहे. त्यात कापूस व अन्य पिकांची लागवड झाली आहे. परंतु कोरडवाहू क्षेत्रात पेरण्या झालेल्या नाहीत. शेतकरी चांगला पाऊस आल्यानंतरच पेरणी करतील.

Kharif Sowing
Kharif Sowing : शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या कधी कराव्यात?

पारोळा तालुका अलीकडे जळगाव जिल्ह्यात भाजीपाला व अन्य पिकांत अग्रेसर आहे. या तालुक्यात खरिपातील एकूण पेरणी सुमारे ५० ते ५२ हजार हेक्टरवर होईल. यात तालुक्यातील २० हजार हजार हेक्टरला सिंचनाची सुविधा आहे. या क्षेत्रात कापसाची लागवड झाली आहे. तर अन्य मोठे क्षेत्र पेरणीविना आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : पाऊस होऊनही पेरणीसाठी शेतकऱ्यांची सावध भूमिका

त्यात यंदा वेळेत पेरणी होईल, अशी अपेक्षा आहे. कापूस बियाणे, खते मुबलक आहेत. परंतु आता पावसाची प्रतीक्षा आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण यंदा मे महिन्यात अनेक दिवस पाऊस आला.

या महिन्यातही पाऊस येत आहे. पण सर्वत्र पेरणीयोग्य पाऊस नाही. यामुळे पेरणीला पारोळ्यासह अन्य भागात सुरवात झालेली नाही. पारोळासह अमळनेर, चाळीसगाव भागात यंदा मक्याची लागवड वाढणार आहे. तसेच धुळ्यातील शिंदखेडा व नंदुरबार तालुक्यात बाजरीची पेरणीही होईल. यामुळे कापसाची लागवड कमी होईल, असे सांगितले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com