Honey Agrowon
ॲग्रो विशेष

Honey : आता मुंबईकरांना मिळणार मधाचा गोडवा; बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात मध विक्री केंद्र सुरू

Sanjay Gandhi National Park : महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत जी वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. यात मधाचे गाव म्हणून कोल्हापुरमधील पाटगावची ओळख असून येथील मध राज्यासह देश आणि विदेशात प्रसिद्ध आहे. यानंतर आता बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील मध देखील प्रसिद्धीच्या मार्गावर आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मधासाठी राज्यातील अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. ज्यात सगळ्यात आधी कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावचे नाव घेतले जाते. येथील मध हा राज्यासह देश आणि विदेशात पसंद केला जातो. तर आता मुंबईकरांना इतर ठिकाणी मधासाठी भटकंती करावी लागणार नाही. येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मधाची गोड चव मुंबईकरांना चाखायला मिळणार आहे. मुंबईकरांसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचा मधाचा सुप्रसिद्ध ब्रँड ‘मधुबन‘ येथे उपलब्ध झाला आहे. तर येथील मध विक्री केंद्राचे उद्घाटन खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते सोमवारी (२९ रोजी) करण्यात आले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, संजय गांधी उद्यानाचे संचालक जी मल्लिकार्जुन तसेच महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मोठ्या प्रमाणात झाडी असून फुलझाडे ही प्रचंड आहेत. यामुळे येथे चांगल्या दर्जाचे आणि गोड मधाची निर्मिती होऊ शकते. यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि वनविभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून मध निर्मिती केली जाणार आहे.

तसेच वन आणि मडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यानंतर तयार झालेले मध मडळाकडून खरेदी केले जाईल. तसाच तो मुंबईकरांसह पर्यटकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी उद्यानात ‘मधुबन‘ मध विक्री केंद्राची सुरूवात करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT