Hirda  Agrowon
ॲग्रो विशेष

Hirda Registration : हिरड्याची सात-बारा उताऱ्यावर नोंद होणार; शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय!

Farming Record : हिरड्याच्या झाडाची नोंद सात-बारा उताऱ्यावर करण्यासाठी पुढील आठवडाभरात प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल. ई-पीक पाहणी अॅपमध्ये हिरड्याची नोंद एकदा झाल्यानंतर ती दर वर्षी करावी लागत आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : हिरड्याच्या झाडाची नोंद सात-बारा उताऱ्यावर करण्यासाठी पुढील आठवडाभरात प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल. ई-पीक पाहणी अॅपमध्ये हिरड्याची नोंद एकदा झाल्यानंतर ती दर वर्षी करावी लागत आहे. अशी नोंद दर वर्षी करण्याची गरज नाही यासाठी या ॲपमध्ये बदल करण्यात यावा.

यासाठी तहसील कार्यालयाने प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठवला आहे. याबाबत तहसीलदार हे स्वतः पाठपुरावा करणार आहेत, अशी ग्वाही आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली.

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे तहसीलदार संजय नागटिळक यांच्या अध्यक्षतेखाली किसान सभेच्या वतीने शेतकरी आणि नागरिकांच्या मागण्यांसाठी नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला गटविकास अधिकारी प्रमिला वाळूज, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, सोनुल कोतवाल, नायब तहसीलदार, किसान सभेच्या वतीने डॉ. अमोल वाघमारे, राजेंद्र घोडे, अशोक पेकारी, दत्तात्रय गिरंगे,

अर्जुन काळे व किसान सभेचे इतर तालुका समिती सदस्य उपस्थित होते. या बैठकीत तालुक्यात रेशनकार्ड वरील नावे ऑनलाइन करणे बाकी होती. ती आता पूर्ण करण्यात आली आहे. यापुढे रेशनिंगविषयीच्या तक्रारी त्वरित सोडविण्यात येतील, रानगव्यांचा त्रास नागरिकांना व शेतीला होणार नाही, भातशेती व इतर शेती पिकांचे आणि पाळीव पशूचे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे ज्यांचे पंचनामे झालेले असतील त्यांची नुकसान भरपाई रक्कम त्वरित दिली जाईल, आदी मागण्या मान्य करण्यात आल्या.

‘मनरेगाची कामे सुरू केली जातील’

पंचायत समिती कार्यालय व आदिवासी विकास विभाग याविषयी एकत्रित प्रयत्न करतील, पडकईची कामे मनरेगामधून केली जातील असे तालुका कृषी अधिकारी यांनी आश्वासित केले. आदिवासी भागांत पुढील काळात मनरेगाची कामे सुरू केली जातील, निराधार पेन्शनविषयक जी प्रकरणे प्रलंबित आहेत ती त्वरित मान्य करण्यात येतील.

वरील मागण्यांवर अत्यंत सकारात्मक चर्चा या वेळी झाली. पुढील काळात ही, या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी आग्रह धरला जाईल. असे किसान सभेच्या वतीने सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Elections: सोलापुरात ‘आयात’ नेत्यांच्या जोरावर भाजपची मोर्चेबांधणी

E Crop Survey: रब्बी हंगामातील ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी बाकी

Maharashtra Elections 2026 Exit Poll: 'भाजप'चेच वर्चस्व; मुंबई ठाकरेंच्या हातून निसटणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Cotton Rate: कापसाच्या भावात चढ उतार कशामुळे सुरू आहेत?

Livestock Health: बळीराजाचे पशुधन संसर्गजन्य रोगामुळे संकटात

SCROLL FOR NEXT