Hirda Compensation : हिरडा उत्पादकांसाठी १४ कोटींची भरपाई मंजूर

Hirda Crop Damage : आंबेगाव तालुक्यात विशेषत: आदिवासी डोंगरी भागात २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे तीन हजार ३५ शेतकऱ्यांचे हिरडा शेतीमालाचे नुकसान झाले होते.
Hirda
HirdaAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘आंबेगाव तालुक्यात विशेषत: आदिवासी डोंगरी भागात २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे तीन हजार ३५ शेतकऱ्यांचे हिरडा शेतीमालाचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांसाठी १४ कोटी ८४ लाख दहा हजार ४६० रुपये रक्कम अनुदान शासनाने मंजूर केले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे,’’ अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली.

श्री. नागटिळक म्हणाले, की सहा लाख ७४ हजार ५९३ किलो हिरडा शेतीमालाचे नुकसान झाल्याचे पंचनामे महसूल व कृषी खात्यामार्फत करण्यात आले होते. डीबीटी पोर्टलवर अपलोड केलेल्या दोन हजार ८७९ खातेदारांपैकी दोन हजार ५६७ खातेदारांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे.

Hirda
Hirda Crop : हिरडा नुकसान भरपाईसाठीचा लढा पुन्हा सुरू

आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे १५२ शेतकऱ्यांची रक्कम प्रलंबित आहे. केवायसी व आधार चुकल्याने अनुक्रमे १६० व १५६ खातेदारांची रक्कम प्रलंबित आहे. येत्या दोन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांनी आधार व केवायसी अपडेट करून डीबीटी पोर्टलवर अपलोड करावे. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर तातडीने रक्कम जमा केली जाईल. सरासरी ४७ हजार रुपयांपासून तीन लाख रुपयांपर्यंतची रक्कम हिरडा नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना मिळाली आहे.

Hirda
Hirda Processing : हिरडा प्रक्रिया उद्योगाला २ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य

- एकूण हिरडा नुकसान : सहा लाख ७४ हजार ५९३ किलो.

- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या : तीन हजार ३५.

- नुकसान भरपाई मंजूर रक्कम : १४ कोटी ८४ लाख दहा हजार ४६० रुपये रक्कम अनुदान.

- बँक खात्यावर जमा झालेल्या शेतकऱ्यांची संख्या : दोन हजार ५६७.

- आधार कार्ड अपडेट व केवायसी नसल्यामुळे बँक खात्यात अनुदान जमा न झालेल्या शेतकऱ्यांची संख्या : ४६८

हिरडा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान शासनाकडून मिळावे म्हणून राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात तीन ते चार वेळा बैठका झाल्या होत्या. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच सदर रक्कम मिळाली आहे, अशी माहिती हिरडा उत्पादक शेतकरी संजय गवारी यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com