Hirda Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Hirda Production : हिरडा उत्पादकांना मदत मिळणार

Hirda Rate : आंबेगाव व जुन्नर तालुक्यांत जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने हिरडा पिकाचे नुकसान झाले होते.

Team Agrowon

Pune News : ‘‘आंबेगाव व जुन्नर तालुक्यांत जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने हिरडा पिकाचे नुकसान झाले होते. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात सुधारित प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवून मदतीबाबतचा निर्णय घेण्यात येईल,’’ असे आश्‍वासन मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी दिले.

मुंबई मंत्रालयात शुक्रवारी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील हिरडा उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने बैठक घेतली. या वेळी त्यांनी, ‘‘शेतकऱ्यांच्या हिरडा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी पंचनामेही करण्यात आले. मात्र, अद्याप त्यांना मदत मिळालेली नाही.

ही मदत त्यांना मिळावी, यादृष्टीने त्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यावेळचा हिरडा पिकाचा बाजारभाव लक्षात घेऊन कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी प्रस्ताव तत्काळ सादर करावा,’’ असे निर्देश दिले. तर ‘‘जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील बाधित गावांची संख्या ८१ असून, शेतकरी संख्या ४१८९ इतकी आहे.

केंद्राच्या आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये याबाबत मदत करण्यास अडचण येत असल्यास विशेष बाब म्हणून लवकरच निर्णय घेतला जाईल. हिरडा नुकसान भरपाईचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल. मान्यता घेऊन या शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत केली जाईल.

येत्या सोमवारपर्यंत (ता. १९) याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने मंत्रालयात मदत व पुनर्वसन विभागाला सादर करावा,’’ असे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. या वेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT