IAS Jitendra Papalkar Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Expert Hub : हिंगोली जिल्हा हळदीचा एक्स्पर्ट हब म्हणून विकसित करावा

IAS Jitendra Papalkar : हिंगोली जिल्हा हळदीचा एक्स्पर्ट हब म्हणून विकसित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या वेळी केले.

Team Agrowon

Hingoli News : जिल्ह्यातील सर्व उद्योजक, निर्यातदार यांनी उद्योग संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आदी योजनेच्या माध्यमातून आपले नव उद्योग सुरू करावेत.

फार्मर प्रोड्यूसर कंपन्या आणि उद्योजकांनी एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत हळदीवर जास्तीत जास्त प्रक्रिया उद्योग सुरू करून निर्यातक्षम उत्पादने तयार करावीत. हिंगोली जिल्हा हळदीचा एक्स्पर्ट हब म्हणून विकसित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या वेळी केले.

जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा उद्योग केंद्रामार्फत एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र शासनाची धोरणे आणि उपक्रमाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी गुरुवारी (ता. १४) एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.

मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी पी. बी. हजारे, निर्यात सल्लागार अमोल मोहिते, सत्यकुमार राठी, सीडबीच्या सहायक व्यवस्थापक क्षितिजा बलखंडे, नांदेड उपविभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक जितेंद्र देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शोएब कादरी, वर्षा लांडगे, निर्यातदार

औद्योगिक संघटनेचे ज्ञानेश्‍वर मामडे, मिटकॉनचे प्रकल्प अधिकारी सुभाष जाधव, खादी व ग्रामोद्योग अधिकारी वाघमारे, जिल्हा उद्योग केंद्राचे पी. व्ही. मेंढे, उद्योग निरीक्षक सुदेशना सवराते, एस. बी. शिंदे आदी उपस्थित होते.

पापळकर म्हणाले, की जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कृषीवर आधारित उद्योग सुरू केले पाहिजेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फार्मर प्रोड्यूसर कंपन्या आहेत. या फार्मर प्रोड्यूसर कंपन्या व बचत गटाच्या माध्यमातून लहान लहान उद्योग सुरू करावेत. एखाद्या गावाने हळदीचे विविध उत्पादने तयार करणारे गाव म्हणून नावारुपास आले पाहिजे.

हिंगोली ओळख जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले पाहिजे. लहान उद्योग सुरू करत मोठ्या उद्योगापर्यंत मजल मारण्याचे काम झाले पाहिजे. हजारे यांनी उद्योजकांसाठी शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या परवान्याबाबत अंमलात आलेल्या नवीन कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT