Farmer Development : महाराष्ट्र शेतकरी आर्थिक विकास फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना

Maharashtra Farmer Economic Development : नांदेड जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र शेतकरी आर्थिक विकास फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडची स्थापना केली आहे.
Farmer Economic Development Farmer Producer Company Member
Farmer Economic Development Farmer Producer Company MemberAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र शेतकरी आर्थिक विकास फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडची स्थापना केली आहे. या कंपनीच्या अध्यक्षपदी बालाजी पाटील शेळके, उपाध्यक्षपदी गोविंदप्रसाद बजाज तर सचिवपदी बालाजी भंडारे यांची एकमताने निवड करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन कंपनी कायद्यानुसार शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून समूह आधारित शेतकऱ्यांना सामूहिकरीत्या विविध योजनांचा लाभ, तसेच सेवा पुरविण्यात येत आहेत.

Farmer Economic Development Farmer Producer Company Member
Agriculture Economy : विदर्भाच्या शेती अर्थकारणाला दुग्धविकासातून मिळेल ‘बूस्ट’

यात कृषी अवजारे बँक, कृषी निविष्ठा विक्री केंद्र, हमीदरानुसार शेतीमाल खरेदी केंद्र, बीजोत्पादन, शेतीमाल खरेदी केंद्र, शेतीमाल तारण कर्ज योजना, विविध कृषी प्रक्रिया उद्योग, शेतकरी प्रशिक्षण, थेट बांधावर कृषी निविष्ठा पुरवठा, मोफत माती व पाणी परीक्षण आदी सुविधांचा समावेश आहे.

Farmer Economic Development Farmer Producer Company Member
PM Kisan Scheme : ‘ई केवायसीअभावी ‘नमो’चे ९६ हजारांवर शेतकरी वंचित’

या कंपनीच्या संचालक मंडळाची पहिली बैठक शनिवारी (ता. ९) नांदेड येथे पार पडली. यात कंपनीच्या अध्यक्षपदी बालाजी पाटील शेळके, उपाध्यक्षपदी गोविंदप्रसाद बजाज, तर सचिवपदी बालाजी भंडारे यांची एक मताने निवड करण्यात आली.

निवडीनंतर संचालकांच्या वतीने अध्यक्ष बालाजी पाटील, उपाध्यक्ष गोविंदप्रसाद बजाज व सचिव बालाजी भंडारे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संचालक सत्यनारायण रेड्डी कोट्टूरवाड, लक्ष्मीबाई पाटील, सुप्रिया विनायक पाटील, गणेश सोनटक्के, श्रीकृष्णा शिंदे, प्रशांत तावडे यांच्यासह संदीप पाटील उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com