APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Hingnaghat APMC : हिंगणघाट बाजार समिती देणार शेतकरी पाल्यांना लॅपटॉप

Latest Agriculture News : अभियांत्रिकीतील प्रवेशित शेतकरी पाल्यांना अनुदानावर लॅपटॉप वितरणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हिंगणघाट बाजार समितीकडून राबविला जात आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Wardha News : अभियांत्रिकीतील प्रवेशित शेतकरी पाल्यांना अनुदानावर लॅपटॉप वितरणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हिंगणघाट बाजार समितीकडून राबविला जात आहे. कोरोनकाळात या योजनेच्या अंमलबजावणीला खीळ बसल्यानंतर या वर्षी पुन्हा विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

हिंगणघाट बाजार समितीच्या वतीने शेतकरी हिताच्या योजना राबविण्यावर भर देण्यात आला आहे. शेतकरी पाल्यांना उच्चशिक्षण मिळावे, याकरिता देखील समिती प्रयत्न करते. त्यानुसार २०११-१२ या वर्षापासून लॅपटॉप वितरणाची योजना सुरू करण्यात आली.

कोरोना आणि बाजार समिती निवडणूक प्रक्रियेमुळे तीन वर्ष ही योजना कार्यान्वित करता आली नाही; परंतु शेतकरी आणि त्यांच्या पाल्यांकडून मागणी झाल्याने यंदापासून पुन्हा ही योजना कार्यान्वित करण्यावर भर देण्यात आला आहे.

हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यांतील शेतकरी व शेतमजुरांना याचा लाभ घेता येईल. अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला संबंधित विद्यार्थी प्रवेशित असावा, असा निकष आहे.

पालकाचा शेतीशिवाय दुसरा कोणताही व्यवसाय नसावा, अर्जासोबत गुणपत्रिका आणि द्वितीय वर्षात प्रवेश घेतल्याची पावती जोडावी, बोनाफाइड प्रमाणपत्र, सातबारा, निव्वळ शेती व्यवसाय असल्याबाबतचे तलाठी प्रमाणपत्र तसेच शंभर रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर शपथपत्र, असे दस्तऐवज प्रस्तावासोबत जोडावे लागतात.

आलेल्या प्रस्तावाची खातरजमा वर्धा येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून केली जाते. त्यानंतर संबंधितांना योजनेच्या लाभासाठी पात्र ठरविण्यात येते. पात्र लाभार्थ्यांना लॅपटॉप किमतीच्या ५० टक्‍के रक्‍कम जमा करावी लागते.

गेल्या दहा वर्षांपासून या उपक्रमात सातत्य राखण्यात आले आहे. दरवर्षी ६५ ते ७० लॅपटॉप वितरित केले जातात. निविदेच्या माध्यमातून लॅपटॉप खरेदी होतात. त्यामुळे कमी दरात ते मिळतात आणि विद्यार्थ्यांना एकूण रकमेच्या ५० टक्‍के रक्‍कमच द्यावी लागते.
- सुधीर कोठारी, सभापती, बाजार समिती हिंगणघाट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT