Private APMC : खासगी बाजार व्यवस्थेच्या अभ्यास अहवालासाठी अडीच महिने मुदत

APMC In Maharashtra : राज्यातील खासगी बाजार आवार व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी आता शासनाने स्थापन केलेल्या अभ्यास गटाला आपला अहवाल सादर करण्यासाठी ७५ दिवसांचा अवधी मिळाला आहे.
Pune APMC
Pune APMC Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : राज्यातील खासगी बाजार आवार व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी आता शासनाने स्थापन केलेल्या अभ्यास गटाला आपला अहवाल सादर करण्यासाठी ७५ दिवसांचा अवधी मिळाला आहे. आधी हा अवधी ४५ दिवसांचा होता.

माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय अभ्यास गटात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्षांचा व्यापारी प्रतिनिधी म्हणून समावेश केला आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कमाल दर मिळण्यासाठी शेतीमालाच्या पणन व्यवस्थेला अधिक स्पर्धाक्षम करण्यासाठी ‘महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३’च्या कायद्यामध्ये वेळोवेळी आवश्यक त्या सुधारणा करून शेतकरी व इतर बाजार घटकांसाठी पर्यायी बाजार व्यवस्थेची तरतूद केलेली आहे.

Pune APMC
Private Market Committees : राज्यातील खासगी बाजार समित्यांचेही होणार यंदा रॅंकींग

परंतु दोन्ही व्यवस्थांत स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना अधिकचा बाजारभाव मिळण्यासाठी फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे खासगी बाजार आवार व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यातून अभ्यास गटाची स्थापना झाली.

Pune APMC
Private APMC In Maharashtra : राज्यातील खासगी बाजार समित्यांचे होणार मूल्यमापन

अभ्यास गटाची कार्यकक्षा वाढली

आधीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील खासगी बाजार आवार व बाजारांना प्राथमिक रूपात भेट, कामकाज व सोयीसुविधांची पाहणी, नियमातील व कायद्यातील तरतुदीची अंमलबजावणी होते की नाही याची चौकशी, कृषी मालाच्या विपणन पद्धतीची पडताळणी, बाजार भाव कपाती रक्कम अदा करायची व्यवस्था आदींचे निरीक्षण, कृषिमाल लिलाव पद्धतीने विक्री होतो किंवा नाही याबाबत करणार तपासणी, सेवा सुविधांचाही आढावा आदींचा समावेश होता.

पण आता यामध्ये थेट पणन, शेतकरी-ग्राहक बाजार, कंत्राटी शेती करार, इलेक्ट्रॉनिक व्यापार आदी व्यासपीठांद्वारे अभ्यास करून त्याचा शेतकऱ्यांना फायदा किती याचा अहवाल अभ्यास गटाला द्यावा लागणार आहे. अभ्यास गटाच्या कार्य कक्षेतील नव्याने समाविष्ट मुद्द्यांना अनुसरून खासगी व्यापारातील अनेक बाबींचा उलगडा होण्याची शक्यता त्यामुळे वर्तविली जात आहे.

शेतकऱ्याच्या शेतीमालाला बाजारपेठेत बाजार समित्या व पर्यायी बाजार व्यवस्थेच्या निकोप स्पर्धेतून योग्य भाव मिळावा. तो का मिळत नाही, याचा अभ्यास केला जाईल. केवळ त्रुटी न काढता त्यावर उपाय सुचवून शेतकरी हित कसे साधता येईल, याच्या शिफारशी अभ्यास गट करेल.
- डॉ. उमाकांत दांगट, अध्यक्ष, अभ्यास गट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com