Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farming : उसासाठी कमी क्षेत्रातून अधिक उत्पादन हवे

Sugarcane Cultivation : हिरवळीचे खत ताग ढेंच्या याचा दोन वेळा वापर करावा तसेच जीवामृत व जिवाणू खते महिन्यातून दोन वेळा वापरावे. कमी क्षेत्रातून विक्रमी उत्पादन हीच फायद्याची ऊस शेती असल्याचे विषय तज्ञ अंकुश सोनावले यांनी सांगितले.

Team Agrowon

Satara News : ऊस पिकाखालील क्षेत्र कमी करून विक्रमी उत्पादनकरिता सेंद्रिय कर्बाची पातळी वाढवणे आवश्यक त्याकरिता उसाची पाचट न जाळता आच्छादन दोन वेळा करावे एक उभ्या उसाची पाचट सात ते आठ महिन्याच्या वेळी आणि ऊस तुटून गेल्यानंतर पाचट अजिबात पेटवू नये.

हिरवळीचे खत ताग ढेंच्या याचा दोन वेळा वापर करावा तसेच जीवामृत व जिवाणू खते महिन्यातून दोन वेळा वापरावे. कमी क्षेत्रातून विक्रमी उत्पादन हीच फायद्याची ऊस शेती असल्याचे विषय तज्ञ अंकुश सोनावले यांनी सांगितले.

लोधावडे (ता. माण) येथे ‘ॲग्रोवन व रिवूलिस इरिगेशन प्रा. लि’ यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘ऊस पीक परिसंवादाचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. सोनावले बोलत होते. यावेळी आत्मा प्रकल्प संचालक अजय शेंडे, रिवूलिस वरिष्ठ शास्त्रज्ञ नितीन जाधव, जिल्हा प्रतिनिधी विकास जाधव, वितरण प्रतिनिधी दत्तात्रय जाधव, मंडल कृषी अधिकारी अश्विनी वणवे, कृषी सहायक स्वाती निकाळजे, बीटीएम राहुल कर्चे, राजेंद्र देशमुख, वसंतराव कदम, संजय मगर, दादा पाटील, शंकर जगताप आदी उपस्थित होते.

श्री. सोनावले म्हणाले, की स्वतःच्या शेतातील मातीतून सुपर केन नर्सरी तयार करून स्वतः तयार केलेलेच रोपे वापरावीत.रुंद सरी वरंबा पद्धतीवर लागवड करावी रोपांची संख्या ५ते ६ एवढीच नियंत्रित ठेवावी. ऊस पिकामध्ये हवा व सूर्यप्रकाश मोकळा आणि खेळता ठेवल्यास विक्रमी उत्पादन येते. विद्राव्य रासायनिक खतांचा वापर फवारणी द्वारे व ठिबक सिंचनाद्वारे करावा.

विक्रमी उत्पादनाकरिता पिकाला पाटाने पाणी नको तर वापसा हवा आहे त्यासाठी ठिबक सिंचन वापर करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. अजय शेंडे म्हणाले, शेत जमिनीत उत्पादन वाढ होण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढविण्याची गरज आहे.

जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी पाण्याचा सुयोग पद्धतीने वापर करावा. नितीन जाधव यांनी रिवूलिस उत्पादनाची माहिती व वापर याविषयी माहिती दिली. राहुल कर्चे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales : ट्रॅक्टरची विक्रीने सलग तीन महिन्यात ओलांडला एक लाखांचा टप्पा; मॉन्सून आणि खतांच्या टंचाईचा होणार परिणाम?

Cotton Crop Management: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर कापूस व्यवस्थापन

Congress Protest: शेतकरी प्रश्नी काँग्रेस आक्रमक, छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्तारोको, ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Global Food Security: जागतिक अन्नसुरक्षेला धक्का बसणार?

Dairy Farming Success Story: दूध व्यवसायाला दिली मूल्यवर्धनाची जोड

SCROLL FOR NEXT