Team Agrowon
ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी व विद्राव्य रासायनिक खतांचा वापर हा तांत्रिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरतो.
उसासाठी शक्यतो १६ मी.मी. व्यासाची इनलाइन ड्रिप वापरणे फायदेशीर असते.
मध्यम खोल जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर कमीत कमी १.५० मीटर (५ फूट) असावे तर जास्त खोलीच्या काळ्या जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर १.८० मीटर (६ फूट) असावे.
दोन ड्रिपरमधील अंतर ४० से. मी. तर ड्रिपरचा प्रवाह दर ताशी १.६ किंवा २ लिटर असावा.
उसासारख्या दीर्घायुषी पिकासाठी जमिनीच्या पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन (अर्थात सबसरफेस ड्रिप सिस्टिम) अतिशय योग्य आहे
एका शिफ्टमध्ये जास्त क्षेत्र ओलिताखालील आणण्यासाठी ताशी १ लिटर प्रवाह देणारे ड्रिपर असणारी इनलाइन वापरणे फायदेशीर आहे.
कमी कालावधीमध्ये सिंचन पूर्ण करण्यासाठी जास्त प्रवाह असणारे ड्रिपर वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र, हे शास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीचे आहे.
Strawberry Health Benefits : लालभडक स्ट्रॉबेरी खाण्याचे जबरदस्त फायदे