Onion Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Farming Crisis: तणनाशक फवारणीचा फटका! दोनशे एकरांवरील कांदा लागवड धोक्यात

Herbicide Damage: नाशिक जिल्ह्यात तणनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत १२८ शेतकऱ्यांचे २०५ एकर कांदा पीक बाधित झाले असून, कृषी विभाग पंचनामे करत आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News: शेतकऱ्यांनी कांदा पिकावर तणनाशक फवारल्याने जिल्ह्यात मंगळवारअखेर (ता.११) १२८ शेतकऱ्यांचे २०५ एकरांवरील नुकसान समोर आले आहे. कृषी विभागामार्फत क्षेत्रनिहाय तपासणी व पंचनामे सुरू असून, हा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच चालल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे.

कांदा पिकातील तणनियंत्रणासाठी शेतकरी तणनाशकाची फवारणी करतात. जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तणनाशक फवारणी केली. यामध्ये ताण जळाले सोबत कांद्याचे पीक जळून गेल्याने नुकसान वाढल्याने शेतकरी संतापले आहेत. कळवणमध्ये १८ शेतकऱ्यांचे २७.४२ एकरचे नुकसान झाले.

यात कळवण खुर्द, पाळे बुद्रुक, पिळकोस, निवाणे, दह्याणे, भुसणी, भेंडी व साकोरे येथील शेतकऱ्यांनी एका नामंकित कंपनीचे तणनाशक फवारले. देवळ्यात ५५ शेतकऱ्यांचे ९८.१५ एकरांवर नुकसान आहे. त्यामध्ये मेशी, महालपाटणे, देवपूरपाडे, फुलेनगर व वरवंडी या गावांचा समावेश आहे. बागलाणमध्येही दहा शेतकऱ्यांचे १८.३० एकरांचे नुकसान झाले. यामध्ये एकलहरे, नांदीन, वाडीपिसोळ, आखतवाडे, निताणे, ताहाराबाद, मुल्हेर गणेशनगर व ब्राह्मणपाडे या गावांमध्ये फवारणी करण्यात आली.

तणफवारणीमुळे आतापर्यंत जिल्ह्यात ८३ शेतकऱ्यांचे १४३.८७ एकरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तसेच आणखी एका नामांकित कंपनीच्या तणनाशकामुळे ४५ शेतकऱ्यांचे ६१.०५ हेक्टरवरील नुकसान झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. निफाड तालुक्यातील लालपडी, वन्हेदारणा, करंजगाव, शिंपी टाकळी येथील १६ शेतकऱ्यांचे २४ एकरांवरचे नुकसान झाले. येवल्यात मुखेड या एकाच गावातील १८ शेतकरी प्रभावित झाले. आणि त्यांच्या ३५.०५ एकराला फटका बसला. आगासखिंड येथील ११ शेतकऱ्यांचे २ एकरांवरचे नुकसान झाले.

नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

तणनाशकांची फवारणी झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली असून, कृषी विभागामार्फत त्यांचे पंचनामे सुरू आहेत. फवारणी केलेल्या तणनाशकामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येवला, निफाडमधील काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार नोंदविली आहे, तर कळवण, बागलाणमध्येही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

नुकसानीचा प्राथमिक अंदाज

तालुका गावे शेतकरी संख्या बाधित एकर

कळवण ८ १८ २७.४२

देवळा ५ ५५ ९८.१५

बागलाण ८ १० १८.३०

निफाड ५ १६ २४

येवला १ १८ ३५.०५

सिन्नर १ ११ २

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT