Onion Farming : आसनगावच्या कांदा बियाण्याची सर्वदूर कीर्ती

Onion Seed : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव उत्तर परिसरात असलेल्या छोट्याशा आसनगावने कांदा बीजोत्पादनात सर्वदूर प्रमुख ओळख तयार केली आहे. सातत्यपूर्ण दर्जेदार बियाणे निर्मितीतून राज्यासह परराज्यांपर्यंत येथील बियाण्याची कीर्ती पोहोचली आहे.
Onion Seed
Onion SeedAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : सातारा जिल्ह्यात कांदा व त्यातील बीजोत्पादन हा रब्बीतील मुख्य कार्यक्रम झाला आहे. जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील आठ ते दहा गावे कांदा बीजोत्पादनात गुंतली असून, आसनगाव त्यातील प्रमुख गाव आहे.

सुमारे १५०० लोकसंख्येचे हे छोटे गाव असून सुमारे साडेचारशे हेक्टर शेतजमीन आहे, यापैकी सुमारे २०० हेक्टर जमीन विहीर, बोअरवेलसह वसना उपसा सिंचनाद्वारे बागायत झाली आहे. ऊस, आले, कांदा ही गावची प्रमुख पिके आहेत.

कांदा बीजोत्पादनातील परंपरा

गावात १९९५ पासून आसनगावात कांदा बीजोत्पादनाला थोड्या थोड्या प्रमाणात सुरुवात झाली. सन २००५-०६ पासून त्यास अधिकाधिक व्यावसायिक स्वरूप येत गेले. शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. बीजोत्पादनासाठीचे अनुकूल वातावरण, बियाण्यास असलेली मागणी व अधूनमधून कांद्यास मिळणारे समधानकारक दर त्यामुळे या पीकपद्धतीला अधिक चालना मिळाली.

नोव्हेंबर महिन्यात बीजोत्पादन कार्यक्रम सुरू होतो. या परिसरात मधमाश्‍यांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या फुलांची लागवड केली जाते. परागीभवनाच्या दृष्टीने फुलोरा काळात कीडनाशक फवारण्या बंद केल्या जातात.

बियाणे तयार झाल्यानंतर त्याची प्रतवारी केली जाते. एकरी सरासरी तीन, चार ते पाच क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. कांद्याच्या दरावर बियाणे दरअवलंबून राहतो. प्रति किलो ६०० रुपयांपासून एक हजारांपर्यंत तर सर्वाधिक दोन हजार रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. एकरी सुमारे अडीच लाख रुपये भांडवली खर्च येतो. खर्च वजा जाता चांगले उत्पन्न हाती राहते.

Onion Seed
Onion Cultivation : सातारा जिल्ह्यात कांदा पिकाचे क्षेत्र वाढणार

अर्थकारण उंचावले

सुरुवातीच्या काळात जिल्ह्यातील शेतकरी बियाणे खरेदी करायचे. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पुरंदर परिसरातून मागणी येऊ लागली. मग नाशिक परिसरापर्यंत आसनगावच्या बियाण्याची प्रसिद्धी झाली. मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यापर्यंत आज हे बियाणे पोहोचले आहे. दर्जेदार बियाणे असल्याने आसनगावची आज राज्यासह परराज्यांतील बाजारपेठांपर्यंत ओळख निर्माण झाली आहे.

दरवर्षी एकूण ५०० ते ६०० क्विंटलपर्यंत बियाणे निर्मिती होत असावी. त्यातून काही कोटींची उलाढाल होत आहे. ऊस हे देखील गावचे प्रमुख पीक आहे. उसा बरोबर आले, स्ट्रॅाबेरी ही पिकेही घेतली जातात. मागील १५ वर्षांत कांदा बीजोत्पादन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

सध्या रब्बी हंगामात ७० ते ८० शेतकऱ्यांकडून १२० ते १३० एकर क्षेत्रावर ही लागवड होतेएकूण व्यावसायिक पीकपध्दतीतून गावकऱ्यांचे अर्थकारण सुधारले आहे. अनेक शेतकऱ्यांनी टुमदार बंगले बांधले आहेत. घरापुढे चारचाकी वाहने, ट्रॅक्टर दिसताहेत. बागायती शेतीत वाढ झाली आहे.

Onion Seed
Onion Cultivation in Maharashtra : उन्हाळ कांदा लागवड लांबणीवर

पाणीटंचाईवर मात : आसनगावात दर उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होत असल्याने टँकरवर विसंबून राहावे लागायचे. त्यावर उपाय म्हणून २०१७-१८ मध्ये ग्रामस्थांनी जलसंधारणाची कामे हाती घेतली. पाणी फाउंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेत भाग घेतला. श्रमदानातून नालाबंड, डीप सीसीटी, बांधबदिस्ती, ओढा खोली- रूंदीकरण आदी कामे केली. सन २०२० मध्ये पाणी पंचायत, योगेश जाधव यांच्या सहकार्यातून गावातील पूर्वीचे दोन पाझर तलावांचे खोली- रूंदीकरण झाले.

सन २०२१-२२ मध्ये भारतीय जैन संघटना, पुणे, ग्रामगौरव संस्था, सासवड व लोकसहभाग यांच्या माध्यमातून उर्वरित ओढ्याचे खोली- रूंदीकरण झाले. यात्रेवर होणारा खर्च कमी करून तो या कामांसाठी उपयोगात आणला. त्यातून गावाने पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची टंचाई दूर केली. गावातील महिलांनीही पुरूषांच्या बरोबरीन सहभाग नोंदवला. वॅाटर कॅप स्पर्धेत कष्टाचे फळ मिळाले. सन २०२३ चा राज्यस्तरीय सर्वात्कृष्ट महिला गटाचा प्रथम क्रमाकांचा पुरस्कार गावातील महिलांनी पटकावला. प्रसिध्द अभिनेते अमीर खान यावेळच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मी दरवर्षी तीन एकरांत कांदा बीजोत्पादन घेतो. अन्य पीक पद्धतीला त्याचा मोठा आर्थिक आधार झाला. त्यातून शेतीचे व घरचे अर्थकारण उंचावले आहे. आज टुमदार बंगला बांधला आहे. चारचाकी देखील घेतली आहे.
अभिजित शिंदे, प्रगतशील शेतकरी. ९८२३६००४७५
अभ्यासूपणे आम्ही कांदा बीजोत्पादन प्लॉटची काळजी घेतो. निरिक्षणे ठेवतो. ऊस, आले या नगदी पिकांप्रमाणेच कांदा बियाणे निर्मितीतून चांगली उलाढाल होते. त्यातून कुटुंबाचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे होत आहे.
- किशोर शिंदे, प्रगतशील शेतकरी ९०११९८६६२४
गावात तयार होणाऱ्या कांदा बियाण्यास सर्वत्र मागणी आहे. त्यामुळे पुढील काळात सर्व शेतकऱ्यांना संघटीत करून बियाण्याला मोठी बाजारपेठ देण्याचा विचार आहे. त्यासाठी आकर्षक पॅकिंग व ब्रॅंडिगं करण्यात येणार आहे.
हेमलता संतोष शिंदे, सरपंच, आसनगाव ९८५०११२४३९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com