Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Issue : नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत द्या : प्रतापराव जाधव

Prataprao Jadhav : खामगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानाची केंद्रीय राज्‍यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पाहणी करीत नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत द्यावी, अशी सूचना यंत्रणांना केली.

Team Agrowon

Buldhana News : या महिन्यात खामगाव, शेगाव तालुक्यांत अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले होते. खामगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानाची केंद्रीय राज्‍यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पाहणी करीत नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत द्यावी, अशी सूचना यंत्रणांना केली.

श्री. जाधव यांनी कोलोरी, पिंपरीगवळी येथे नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी केली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, तहसीलदार अतुल पाटोळे आदी उपस्थित होते.

श्री. जाधव म्हणाले, की खामगाव तालुक्यातील ११ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टी झाली नसलेल्या पारखेड मंडळातील ज्या भागात जास्त पाऊस झालेला आहे, तेथीलही पंचनामे करावेत. तालुक्यात ८३८ हेक्टर जमीन खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

त्यामुळे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन केलेल्या पंचनाम्याचे अहवाल ग्रामपंचायतीमध्ये सादर करावे आणि हे अहवाल चावडीवाचन करून नागरिकांना सांगावे. साधारणतः २४२ कुटुंबे पुराच्या पावसामुळे बाधित झाले आहेत. त्यामुळे त्यांचाही अहवाल शासनाकडे सादर करावा.

गतीने पंचनामे होण्यासाठी इतर भागातील तलाठी आणि मंडळ अधिकारी याची पंचनाम्याकरिता नियुक्ती करण्यात यावी. पंचनाम्यासाठी स्थायी आदेश देण्यात आलेले आहेत. पिंपरी गवळीमध्ये २०० , तर कोलोरी येथे १०० हेक्टर जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे याचा पंचनामा करावा,’’ असेही जाधव यांनी सूचवले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT