Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Damage : वादळी वाऱ्यासह पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान

Heavy Rain Crop Loss : काही भागात अजून सोयाबीनचे पीक पाण्याखाली आहे. यातच गुरुवारी (ता. तीन) लोहारा तालुक्यातील अनेक गावांना वादळी पावसाने झोडपून काढले. याचा सर्वाधिक फटका खेड व नागूर गावांना बसला.

Team Agrowon

Dharashiv News : जिल्ह्याच्या विविध भागात मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असून या पावसाने सोयाबीन काढणीच्या कामात व्यत्यय येत आहे. काही भागात अजून सोयाबीनचे पीक पाण्याखाली आहे. यातच गुरुवारी (ता. तीन) लोहारा तालुक्यातील अनेक गावांना वादळी पावसाने झोडपून काढले.

याचा सर्वाधिक फटका खेड व नागूर गावांना बसला. झाडे उन्मळून पडली तर विजेच्या तारा तुटल्या. अनेक घरांमध्ये पाणीही घुसले. दोन घरांच्या भिंती कोसळून नुकसान झाले. गुरुवारी दुपारी खेड, नागूर, सालेगाव भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दोन तास झालेल्या वादळी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले.

खेड येथील बालाजी कांबळे यांच्यासह अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेच्या खांबावरील ताराही तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. उसाचे पीकही आडवे झाले. राजेंद्र जाधव, दीपक जाधव यांच्या घरांच्या भिंती कोसळल्याने घरांचे नुकसान झाले आहे.

शेखर पाटील, हणमंत पाटील, भीमाशंकर कडबाने, विश्वनाथ पाटील, ऋषीकेश पाटील, सिद्राम पाटील यांनी वाळू घातलेले सातशे पोत्यांपेक्षा अधिक सोयाबीन भिजले. माकणी, सास्तूर, कानेगाव, नागूर, खेड, हिप्परगा (रवा), आष्टाकासार, जेवळी, भातागळी, अचलेर, धानुरी, तोरंबा, हराळी, तावशीगड, भोसगा, फनेपूर, वडगाव गां, वडगाव वाडी, रुद्रवाडी, विलासपूर पांढरी, धानुरी, हराळी, हिप्परगा सय्यद, करवंजी, मार्डी आदी भागात सलग चार दिवसांपासून वादळी पाऊस होत आहे. यामुळे सोयाबीन काढणीचे काम ठप्प झाले असून सखल भागात पीक पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT