Rain Alert  Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : भंडारदरा, मुळा पाणलोटात जोरदार पाऊस सुरू

Rain Update : नगर ‘‘जिल्ह्यातील अन्य भागांत अल्प पाऊस असला तरी अकोले तालुक्याच्या पश्‍चिम भागातील आदिवासी पट्ट्यात, मुळा, भंडारदरा धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस सुरू आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर ‘‘जिल्ह्यातील अन्य भागांत अल्प पाऊस असला तरी अकोले तालुक्याच्या पश्‍चिम भागातील आदिवासी पट्ट्यात, मुळा, भंडारदरा धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ४९ टक्के झाला आहे. मुळात धरणातही ३५ टक्के पाणी झाले आहे,’’ अशी माहिती पाणी विषयाचे अभ्यासक हरिचंद्र चकोर यांनी दिली.

नगर जिल्ह्याच्या अन्य भागात जोरदार पाऊस नाही. अल्प पावसावर पीक जोमात आहे. भंडारदरा, मुळाच्या पाणलोटातील अकोले तालुक्याच्या पश्‍चिम भागात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे.

त्यामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. भंडारदरा धरणात महिनाभरात सुमारे चार टीएमसी पाणी आले असून ४९ टक्के पाणीसाठा झाला आहे. असाच पाऊस राहिला तर १५ ऑगस्टपर्यंत धरण भरू शकते, असा अंदाज आहे.

मुळाचे पाणलोट असलेल्या हरिचंद्रगड परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुळाचा पाणीसाठा ३५ टक्के म्हणजे ९ टीएमसी झाला आहे. मुळात तीन ‘टीएमसी’च्या जवळपास पाणी आले आहे.

निळवंडे धरणाचा पाणीसाठा २० टक्के झाला आहे. भंडारदरा भरल्याशिवाय निळवंडेचा पाणीसाठा वाढत नाही. मुळा नदीतून मुळा धरणात रविवारी (ता. २१) सकाळी ४ हजार २२७ क्युसेकने पाणी येत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा, कापसाला आधार, आल्याचे भाव टिकून, मक्याची आवक स्थिर, भेंडीची आवक स्थिर

Weather Update: २८ जिल्ह्यात पावसाचा इशारा; तर तुरळक ठिकाणी गारपीटीची अंदाज

Crop Damage Compensation: कीड-रोगांमुळे पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का? कृषिमंत्र्यांचा मोठा खुलासा

Labor Shortage: उष्णतेने मजूरटंचाई खानदेशात वाढली

Tapi Irrigation Project Issue: पाडळसे निम्न तापी सिंचन प्रकल्प रखडलेलाच

SCROLL FOR NEXT