Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : पावसामुळे खरीप पिकांना जीवनदान

Hingoli Rainfall : अनेक दिवसांच्या खंडानंतर हिंगोली व परभणी जिल्ह्यांत बुधवारी (ता. २५) दुपारपासून पाऊस सुरू झाल्यामुळे वाढीच्या अवस्थेतील पिकांना जीवनदान मिळाले.

Team Agrowon

Hingoli News : अनेक दिवसांच्या खंडानंतर हिंगोली व परभणी जिल्ह्यांत बुधवारी (ता. २५) दुपारपासून पाऊस सुरू झाल्यामुळे वाढीच्या अवस्थेतील पिकांना जीवनदान मिळाले. गुरुवारी (ता.२६) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांत हिंगोली जिल्ह्यात सरासरी ४८.१ मिलिमीटर, तर परभणी जिल्ह्यात सरासरी १९.९ मिलिमीटर पाऊस झाला.

कळमनुरी व वसमत तालुक्यांतील १० मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. अनेक भागात गुरुवारी (ता. २६) दुपारपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. दीर्घ खंडामुळे वाढीच्या अवस्थेतील सोयाबीन, तूर, कपाशी, मूग, उडीद, हळद आदी पिकांना पाण्याचा ताण बसला होता.

हिंगोली व परभणी जिल्ह्यांत बुधवारी (ता. २५) दुपारपासून पाऊस सुरू आहे. अनेक भागांत रात्रभर पाऊस सुरू होता. अधून मध्यम सरी येत आहेत. चांगला पाऊस झालेल्या भागात रखडलेल्या पेरण्या सुरू होऊ शकतील.

हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी सकाळी १० पर्यंत वाकोडी, आखाडा बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, वसमत, अंबा, हयातनगर, गिरगाव, टेंभुर्णी, कुरुंदा मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. मागील २४ तासांत ४८.१ मिलिमीटर, तर १ जूनपासून आजवर ११७.३ मिलिमीटर (८० टक्के) पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

हिंगोली जिल्हा ः हिंगोली ४१.३, नरसी नामदेव ४७.८, सिरसम ४६, बासंबा ४१.३, डिग्रस कऱ्हाळे ३९, माळहिवरा ४६, खंबाळा ४६, कळमनुरी ५०.३, वाकोडी ७८.५, आखाडा बाळापूर ९४.३, डोंगरकडा ७०.८, वारंगा ६७.५, वसमत ६६.अंबा ६६, हयातनगर ६६, गिरगाव ६७, टेभुर्णी ६६, कुरुंदा ७३.८, हटटा १७.८, औंढानागनाथ ३६.५, येळेगाव ३९, साळणा ४०, जवळा बाजार २३.८, सेनगाव २६,५, गोरेगाव २२.५, आजेगाव २२.५, साखरा २९, पानकन्हेरगाव ३५.३, हत्ता २९.

परभणी जिल्हा ः परभणी १८, परभणी ग्रामीण २४.८, पेडगाव १६.५, जांब १२.८, झरी १९.३, सिंगणापूर ११.५, दैठणा ३७.५, पिंगळी २४.८, टाकळी कुंभकर्ण १३.५, जिंतूर २१, सावंगी म्हाळसा २९, बामणी ४०, बोरी १९, आडगाव ३४.८, चारठाणा १३.३, वाघी धानोरा २१.८, दूधगाव १९.३, वालूर १५.३, कुपटा १७.३, चिकलठाणा १२.५, मोरेगाव १३.८, कोल्हा ११.५, ताडबोरगाव ११.५, रामपुरी ३२, वडगाव १०, गंगाखेड १८, महातपुरी

१५, माखणी १३.३, राणीसावरगाव १७.५, पिंपळदरी १७.८, पालम ४८.३, चाटोरी १७.५, बनवस १७, पेठशिवणी ४९.८, रावराजूर २९.५, पूर्णा ४१, ताडकळस ३०.३, लिमला २९.५, कात्नेश्वर २८.५, चुडावा, ६४.५, कावलगाव ३८.३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Edible Oil : खाद्यतेलाचा यशस्वी स्वानंद शतायू ब्रॅण्ड

Pomegranate Farming : चुकांकडे लक्ष दिले ; डाळिंबात प्रावीण्य मिळविले

Climate Change : हवामान बदलाचा फटका फळ आणि भाजीपाला पिकांना; राज्यसभेत केंद्र सरकारची कबुली

Satbara Document: सातबारा हा महत्त्वाचा दस्तऐवज

Maharashtra Politics: सभ्यतेचा न्याय कुणाकुणाला लावणार?

SCROLL FOR NEXT