Kharif Sowing 2025: खरिपाच्या अर्ध्या पेरण्या अपूर्ण

Maharashtra Agriculture 2025: राज्यात यंदा खरिप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे पेरण्या उशिराने सुरू झाल्या असून, आतापर्यंत केवळ ३९ टक्के क्षेत्रावरच पेरा पूर्ण झाला आहे. विशेषतः कडधान्यांची पेरणी रखडली असून, उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्यात खरिपाचा पेरा निम्म्याहून अधिक अद्याप झालेला नाही. मात्र पावसाने उघडीप दिल्यामुळे येत्या पंधरवड्यापूर्वी उर्वरित पेरा पूर्ण होऊ शकतो, असा दावा कृषी विभागाच्या सूत्रांनी केला आहे.

राज्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र १४४ लाख हेक्टर आहे. बुधवारअखेर (ता. २५) यातील केवळ ५६.५४ लाख हेक्टरवरील पेरा पूर्ण झालेला होता. हा पेरा सरासरी क्षेत्राच्या फक्त ३९ टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत पेरा ६१.६८ लाख हेक्टरपर्यंत झालेला होता. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरा पिछाडीवर आहे. यंदा एकूण खरीप पेरा १५६ लाख हेक्टरच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. त्यामुळे उद्दिष्टाच्या तुलनेत अजून १०० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रात पेरा झालेला नाही.

Kharif Sowing
Kharif Sowing : पावसाअभावी पेरण्या संकटात

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, पावसाची उघडीप पाहून बहुतेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पेरण्या वेगाने केल्या जात आहेत. पुन्हा अतिपाऊस न झाल्यास येत्या १०-१२ दिवसांत सर्व पेरा आटोपण्याची शक्यता आहे. पेरण्या न झाल्यामुळे राज्यातील कडधान्य पेऱ्याचे वेळापत्रक मात्र विस्कळीत झाले आहे. त्यामुळे कडधान्य उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. विशेषतः मुगाचा ६० टक्के पेरा रखडला आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing Marathwada : मराठवाड्यात २४ लाख ४५ हजार हेक्टरवर पेरणी

उडदाच्या देखील निम्म्या पेरण्या झालेल्या नाहीत. तूर वगळता कडधान्य पिकाच्या पेरण्या उशिरा झाल्यास उत्पादनात मोठी घट येते. अतिपावसामुळे यंदा नेमक्या कोणत्या पिकाच्या उत्पादनाला फटका बसू शकतो, याचा अंदाज अजूनही कृषी विभागाला आलेला नाही. परंतु, तूर, मका, ऊस, सोयाबीन, भुईमूग अशा नगदी पिकांचा पेरा वाढण्यास स्थिती अनुकूल असल्याचा दावा कृषी विभागातील अधिकारी करीत आहेत.

दरम्यान, राज्यातील सोयाबीन उत्पादक पट्ट्यात काही ठिकाणी पेरा घटू शकतो, असे कृषिशास्त्रज्ञांना वाटते. खुल्या बाजारात सोयाबीनला प्रतिक्विंटल भाव केवळ चार हजार रुपयांच्या आसपास आहेत. त्यामुळे सोयाबीनचे क्षेत्र कमी करून काही भागात मका लागवडीला प्राधान्य दिले जात आहे, असे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे.

Chart
ChartAgrowon
राज्यात सोयाबीनचा पेरा १० जुलैपर्यंत करण्याची शिफारस आहे. या पिकाचे सरासरी क्षेत्र ४७ लाख हेक्टरच्या पुढे आहे. आतापर्यंत निम्मा पेरा पूर्ण झाल्याचा अंदाज आहे. उर्वरित पेरा दोन आठवड्यांत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादकतेची नव्हे; तर घटत्या बाजारभावाची चिंता जास्त भेडसावते आहे.
डॉ. एस. के. धापके, निवृत्त सोयाबीन पैदासकार, प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्र, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com