Water Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Discharge : पावसाचा जोर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील 19 धरणांतून विसर्ग

Pune Heavy Rainfall : पावसामुळे जिल्ह्यातील धरणांत वेगाने आवक वाढत असून, जवळपास १९ धरणांतून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात जोरदार पाऊस पडत आहे. प्रामुख्याने घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २८० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. पावसामुळे जिल्ह्यातील धरणांत वेगाने आवक वाढत असून, जवळपास १९ धरणांतून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे भीमा, मुठा, पवना, आरळा, कुकडी, मीना, नीरा, घोड, हंगा या नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. कुंडली या घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. या घाटमाथ्यावर १५२ मिलिमीटर, तर लोणावळा १५१, वळवण १२६, ठोकरवाडी ६५, शिरोटा ४२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर मुळशी धरण क्षेत्रात १९४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला धरण क्षेत्रात पावसाचा चांगलाच जोर आहे. निरा खोऱ्यातील गुंजवणी, नीरा देवघर, भाटघर, वडीवळे, पवना, कळमोडी, भामा आसखेड, आंध्रा या धरण क्षेत्रात पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. कासारसाई, शेटफळ, नाझरे, वीर या धरण क्षेत्रात तुरळक सरी पडल्या. कुकडी खोऱ्यातील माणिकडोह, येडगाव, पिंपळगाव जोगे, वडज, डिंभे, चिल्हेवाडी या धरण क्षेत्रात पावसाच्या तुरळक पाऊस पडला.

तर घोड धरण क्षेत्रात ढगाळ वातावरण होते. विसापूर, उजनी धरण क्षेत्रातही काही अशी पावसाचा शिडकावा झाला. या पावसामुळे धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. मागील चोवीस तासांमध्ये तब्बल ११.१३ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठा हा ७५ टक्क्यांहून अधिक झाला आहे. तर चार धरणे शंभर टक्के भरली असून धरणांत १७३.६४ टीएमसी म्हणजेच ८७ टक्के उपलब्ध पाणीसाठा झाला आहे.

रविवारी (ता.२७) सकाळी आठ वाजेपर्यंत धरण क्षेत्रनिहाय झालेला पाऊस : (मिलिमीटरमध्ये, कंसात विसर्ग, क्युसेकमध्ये)

मुळशी १९४ (९४००), टेमघर ७४, वरसगाव ५६ (२२७२), पानशेत ५४, खडकवासला १७ (२२९७), पवना ६० (१३१०), कासारसाई १० (४१४), कळमोडी ४८ (२८१९), चासकमान ११ (८१८०), भामा आसखेड २२, आंध्रा २६ (१४९८), वडीवळे ८७ (४२२३), नाझरे ५, गुंजवणी ३२ (२५०), भाटघर १५ (३४६१), निरा देवघर ५१ (३४८४), वीर (१६८५२), पिंपळगाव जोगे १३, माणिकडोह १२, येडगाव ६ (१०००), वडज २(१२३०), डिंभे १८ (२८५०), चिल्हेवाडी १७ (१६९८), विसापूर (६४), उजनी ३ (३८३६०)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT