Kolapur News: रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी मजबूत राहण्याची शक्यता असून, महाराष्ट्रात अनेक साखर कारखान्यांचे गाळप हंगाम संपत आल्याने बाजारातील उपलब्धता कमी होऊ शकते. त्यामुळे आगामी काळात साखरेच्या दरांत तेजीचा कल कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्राने मार्चसाठी २२.५ लाख टनांचा साखर कोटा जाहीर केला आहे..देशांतर्गत साखर बाजारात सध्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. विविध राज्यांतील एस- ३० आणि एम- ३० साखरेच्या दरांमध्ये बहुतांशी स्थिरता असून, काही भागांत किरकोळ तेजी नोंदवली जात आहे. महाराष्ट्रात एस ३० साखरेचे दर प्रति क्विंटल ३७०० ते ३७२० रुपयांच्या दरम्यान आहेत. एम- ३० साखरेचे दर ३८०० ते ३८२० रुपये आहेत..Sugar Price Fall: दरातील घसरणीमुळे साखर उद्योगात चिंता.दक्षिण कर्नाटकात साखरेचे दर तुलनेने उच्च पातळीवर आहेत. एस- ३० साठी ४१०० ते ४१२५ रुपये, तर एम- ३० साठी ४१५० ते ४१७५ रुपये दर मिळत आहेत. उत्तर प्रदेशात एम ३० साखरेचे दर ४०३० ते ४१३० रुपये प्रति क्विंटल इतके आहेत. गुजरातमध्ये एस ३० साखरेचे दर ३८११ ते ३८३१ रुपये, तर एम ३० साखरेचे दर ३८५१ ते ३९०१ रुपये दरम्यान आहेत..Sugar Prices: साखरेच्या दरावर दबाव; निर्यात कोटा वाढवण्याची केंद्राकडे मागणी.महाराष्ट्राचा कोटा घटवलाफेब्रुवारी २०२६ च्या तुलनेत काही राज्यांचा कोटा वाढवला असून, काही प्रमुख साखर उत्पादक राज्यांचा कोटा घटवला आहे. राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन असलेल्या उत्तर प्रदेशला मार्चमध्ये ७ लाख ५५ हजार १९६ टन कोटा देण्यात आला असून, फेब्रुवारीच्या तुलनेत ४७ हजार ५०९ टनांची वाढ (६.७१ टक्के) झाली आहे..महाराष्ट्राचा साखर कोटा मात्र घटून ८ लाख १२ हजार १९८ टनांवर आला आहे. फेब्रुवारीतील ९ लाख ३५ हजार ८९८ टनांच्या तुलनेत १ लाख २३ ७०० टनांची घट (१३.२२ टक्के) नोंदवली गेली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.