New Delhi News: देशाने धान्य उत्पादनात एक नवीन टप्पा गाठला असून, ते ३,५७० लाख टनांपर्यंत पोहोचले. गेल्या दहा वर्षांत देशातील धान्योत्पादनात ४४ टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी (ता. ११) लोकसभेतील प्रश्नोत्तरादरम्यान दिली..‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तसेच धान्य उत्पादन वाढीसाठी अनेक शेती सुधारणा आणि धोरणे राबविण्यात आली आहेत. भारताने भात उत्पादनात जगात आघाडी घेतली आहे..Foodgrain Production: भारतानं धान्य उत्पादनात नवा इतिहास रचला, भात उत्पादन सर्वाधिक, विक्रमी वाढ.भारत नुकताच चीनला मागे टाकत जगातील सर्वांत मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे. देशाने कडधान्ये उत्पादनात देखील लक्षणीय वाढ नोंदविली. कडधान्ये उत्पादन १९० लाख टनांवरून सुमारे २६० लाख टनांपर्यंत पोहोचले आहे,’’ असेही कृषिमंत्री यांनी सांगितले..शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते मिळावीत, यासाठी केंद्र सरकारकडून गेल्या वर्षी १.८६ लाख कोटी रुपयांचे खत अनुदान देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. देशात २०१५-१६ मध्ये एकूण धान्योत्पादन २५१५.४२ लाख टन एवढे होते. २०२४-२५ मध्ये त्यात वाढ होऊन ते ३,५७७ लाख टनांवर पोहोचले..Foodgrain Production: यंदा देशात धान्य उत्पादनात सुधारणा, पण बंपर पीक नाही, कृषी विभागाचा अंदाज काय सांगतो? .यात सुमारे ३.६ टक्के वार्षिक वाढ दिसून आली. २०२५-२६ मधील खरिपाच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, धान्य उत्पादन विक्रमी १,७३३.३० लाख टन होण्याची शक्यता आहे. तसेच २०२५-२६ मधील वार्षिक जीडीपीच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, शेती आणि त्याच्याशी संलग्न क्षेत्राचे एकूण सकल मूल्यवर्धन (जीव्हीए) ५२,०८,८०० कोटी इतके राहण्याचा अंदाज आहे, ज्यात २.४ टक्के वाढ दिसते..१०० जिल्ह्यांत ‘धन-धान्य’ची अंमलबजावणीधान्य उत्पादनात संतुलित वाढ सुनिश्चित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी देशातील १०० जिल्ह्यांत पंतप्रधान धन-धान्य योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. पण पश्चिम बंगाल सरकारने ही योजना लागू केलेली नाही. शेतकऱ्यांच्या उत्पन्न आणि धान्य उत्पादन वाढीसाठी या योजनेअंतर्गत पश्चिम बंगालमधील पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झाडग्राम या चार जिल्ह्यांची निवड केली असल्याचे ते म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.