Rain Alert Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सिंधुदुर्गात जोरदार पाऊस, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात

River Water Level : गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिली होती. परंतु काल सायंकाळनंतर पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून (ता. १३) सकाळपासून जिल्ह्याच्या सर्व भागात जोरदार सरी पडत आहेत. त्यामुळे पडझडीच्या प्रकारात देखील वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन दिवस आँरेज अलर्ट जाहीर केला आहे.

७ जुलैला जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक राहिला. परंतु उर्वरित जिल्ह्यात मात्र पावसाचे प्रमाण संमिश्र राहिले. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिली होती. परंतु काल सायंकाळनंतर पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला.

जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली तालुक्यांत काल सायंकाळी उशिरा जोरदार सरी कोसळल्या होत्या. त्यानंतर रात्रभर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत होत्या. काही भागांत मुसळधार पाऊस देखील पडत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पडझडीचे प्रकार सुरू झाले आहेत. कणकवली तालुक्यातील कळसुली येथील विनायक दळवी यांचे घर मुसळधार पावसामुळे कोसळले.

जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, वैभववाडी, कुडाळ तालुक्यांत जोरदार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नद्यांच्या पाणीपातळीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या काही भागात पावसाने दोन- तीन दिवस उघडीप दिल्यामुळे भातरोपे पुनर्लागवड रखडली होती. परंतु काल सायंकाळपासून जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे भातरोप पुनर्लागवडीला देखील गती प्राप्त झाली आहे.

पुढील चार दिवस आँरेज अलर्ट

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असताना हवामान विभागाने पुढील चार दिवस जिल्ह्यात आँरेज अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीत जिल्ह्याच्या अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून समुद्रात प्रतिताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहणार आहेत. या कालावधीत समुद्रात कुणीही जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT