Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सातारा जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

Weather Forcast : दुष्काळी पट्ट्यातील काही भागांसह जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात बुधवारी (ता. ८) पहाटे पावसास सुरवात झाली.

Team Agrowon

Satara News : दुष्काळी पट्ट्यातील काही भागांसह जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात बुधवारी (ता. ८) पहाटे पावसास सुरवात झाली. जिल्ह्यात रविवारी (ता. ५) सातारा, कऱ्हाड तालुक्यांतील काही ठिकाणी हलका पाऊस झाला होता.

गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण झाले होते. मंगळवार (ता.७) रात्रीपासूनच पावसाचे वातावरण झाले होते. बुधवारी पहाटेपासून पावसास सुरुवात झाली. माण तालुक्यात मलवडी, बिजवडी परिसरांत दमदार पाऊस झाला आहे.

खटाव तालुक्यातील औंध, बुध, मायणी, कलेढोण, गारुडी, विखळे, पडळ, तरसवाडी, कान्हारवाडी, धोंडेवाडी, दातेवाडी, चितळी, मोराळे, निढळ, पुसेगाव परिसरांतही दमदार झाला आहे. या परिसरात सुमारे दोन तास पाऊस झाला आहे.

या पावसामुळे अनेक शेतात पाणी साचले होते. या पावसामुळे दुष्काळ तालुक्यातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. पाटण तालुक्यातील चाफळ परिसर, कराड, सातारा, वाई, कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांत दमदार पाऊस झाला आहे.

हा पाऊस बागायती पिकांना उपयुक्त ठरणार आहे. दुष्काळी भागातील खरीप वाया गेला असला तरी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुष्काळी तालुक्यासह सर्वच तालुक्यात रब्बी पेरणी सुरू असून या पिकांना फायदेशीर ठरणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सिताफळाला मिळतोय उठाव; तुरीचा बाजार मंदीतच, फ्लाॅवरची आवक कमीच, लसणाचे भाव स्थिर तर मुगाचा भाव नरमला

Gokul Dairy: दूध फरक वाटपातील गोंधळामुळे ‘गोकुळ’ प्रशासन धारेवर

Farm Roads: तीन हजार पाणंद रस्त्यांच्या झाल्या नोंदी

Maharashtra Monsoon Rain: तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज; राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Drip Irrigation Projects : सूक्ष्म सिंचनच्या प्रस्तावांना पूर्वसंमतीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT