Beed News : यंदा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अल्प कालावधीतच खरीप पिके करपून गेली. तर, कपाशी, सोयाबीन पिकांचे उत्पादन घटल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे. भर पावसाळ्यात नदी- नाल्यांला पाणी आले नसल्याने भूजल पातळीत वाढ झाली नसल्याने विहिरी अखेरच्या घटका मोजताहेत. असे असतानाही शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला नसल्याने तालुकावासियांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र ६४ हजार ४१३ हेक्टर क्षेत्र असून, ५४ हजार २३४ हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. या नुसार ४५ हजार ३५८ हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली होती. तालुक्यात सरासरी पर्जन्यमान ५१५.६ होणे अपेक्षित होते; पण यावर्षी ३९४.६ मिलिमिटर पाऊस झाला असल्याने सिंदफना, उथळा या मोठ्या नद्यांबरोबर ओढ्या, नाल्यांना पाणी आले नसल्याने ते कोरडेठाक अवस्थेत आहेत.
त्याच बरोबर उथळा प्रकल्प, वारणी, मोरजळवाडी, हिवरसिंगा, खोकरमोह, फुलसांगवी, खराबवाडी हे सिंचन प्रकल्पही कोरडे पडले आहेत. यामुळे भूजल पातळीत वाढ झाली नसल्याने तालुक्यातील गावांत पाण्याची पातळी खालावली गेल्याने पाणी साठ्यात घट होत आहे.
दुष्काळाचे निकष
दुष्काळ जाहीर करताना पर्जन्यमान तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मुदत आद्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची परिस्थितीत या घटकांचा विचार केला जातो. या सर्वच अटीत तालुका बसला असला तरी दुष्काळ जाहीर होणे अपेक्षीत होते; पण शासनाकडून पहिल्या टप्प्यात का डावलण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.