Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Rain : पुणे जिल्ह्यात पावसाची उघडझाप

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाची उघडझाप सुरूच आहे. विविध भागांत पाऊस तुरळक स्वरूपात हजेरी लावत आहे. तर मध्येच उघडीप देत आहे. मागील दोन दिवसांपासून दिवसा ऊन तर रात्री पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. १६) इंदापूर येथे सर्वाधिक ३५ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे पिके काढणीच्या कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे पिकांच्या मळणीच्या कामांना विलंब होत आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत पाऊस पडत आहे. सकाळी काही प्रमाणात ढगाळ वातावरण असले, तरी दहा वाजेनंतर ऊन पडण्यास सुरुवात होत आहे. दुपारी चांगलेच कडक ऊन पडत आहे.

त्यामुळे उकाड्यात वाढ होत असून कमाल तापमानात वाढ होत आहे. तर सायंकाळनंतर वातावरणात बदल होत असून रात्री काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. त्यातच पावसाने उघडीप दिल्यामुळे सध्या सोयाबीन, कापूस, भुईमूग या पिकांची काढणी वेगाने सुरू आहे. त्यामुळे काढणीच्या केलेल्या पिकांचे पावसामुळे नुकसान होत आहे.

जिल्ह्यातील हवेलीतील कोथरूड, थेऊर, उरुळीकांचन, खेड, भोसरी, चिंचवड, कळस, हडपसर, वाघोली, अष्टापूर येथे तुरळक सरी पडल्या. तर मुळशीतील पौड, घोटावडे, थेरगाव, माले, मुठे, पिरंगुट येथे हलका पाऊस झाला.

भोरमधील आंबवडे येथे १८ मिलिमीटर, तर भोर, भोलावडे, नसरापूर, किकवी, वेळू, संगमनेर, निगुडघर, मावळमधील कार्ला, लोणावळा जुन्नरमधील नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, राजूर, डिंगोरे, आपटाळे, ओतूर, खेडमधील वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, कडूस, आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, कळंब, मंचर, शिरूरमधील न्हावरा, मलठण, तळेगाव, रांजणगाव, कोरेगाव येथे हलका पाऊस झाला.

वेल्हा तालुक्यातील वेल्हा येथे १२ मिलिमीटर, तर आंबवणे येथे तुरळक शिडकावा झाला. बारामतीतील पणदरे, वडगाव येथे २५ मिलिमीटर, तर बारामती २४, माळेगाव १७, उंडवडी येथे २१ मिलिमीटर, तर लोणी, सुपा, मोरगाव येथे हलका पाऊस झाला.

इंदापूरातील अंथुर्णी येथे ३२ मिलिमीटर, तर लोणी २६, बावडा १७, काटी, सणसर २४, निमगाव येथे २० मिलिमीटर, तर भिगवण येथे हलका पाऊस झाला. दौंडमधील देऊळगाव, पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड, पारगाव, बोरी पार्धी, पुरंदरमधील सासवड, भिवंडी, कुंभारवळण, जेजुरी, राजेवाडी, वाल्हा येथे हलका पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Soybean Market : सोयाबीनच्या ‘शेतीमाल तारण’ला ओलाव्याची अडचण

Crop loan Distribution : रब्बीसाठी पीक कर्जवितरण आढावा बैठकच नाही

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन नरमले; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर?

Flood Damage Compensation : २०२० चा पीक विमा बीड जिल्ह्याला मिळालाच नाही; खंडपीठाचे राज्य शासनासह बीडचे जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT