Pune Rain : पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरी

Rain Update : पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. मंगळवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यंत आंबेगाव येथे सर्वाधिक ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. मंगळवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यंत आंबेगाव येथे सर्वाधिक ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे भात पिकांना दिलासा मिळत असला तरी बाजरी, भुईमूग, सोयाबीन पिकांच्या काढणीस अडथळे येत असून शेतकऱ्यांची धावपळ उडत आहे.

मागील काही दिवसांपासून सकाळपासून कडक ऊन पडत आहे. त्यामुळे उकाड्यात मोठी वाढ होत आहे. अनेक ठिकाणी बाजरी, सोयाबीन, भुईमूग या पिकांची काढणी वेगात सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी या पिकांच्या मळणीची कामे सुरू आहेत. परंतु दुपारनंतर अचानक मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.

Rain
Rain Alert : बुलडाणा, खानदेशात पावसाच्या जोरदार सरी

हवेलीत सोमवारी सायंकाळी अचानक ढग भरून आले. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. प्रामुख्याने पुणे वेधशाळा, केशवनगर, खडकवासला, उरुळी कांचन, खेड, भोसरी, चिंचवड, कळस, हडपसर, वाघोली येथे वादळी हलका पाऊस पडला. तर मुळशीतील माले, मुठे, भोरमधील भोलावडे, नसरापूर, किकवी, वेळू, आंबवडे, संगमनेर, निगुडघर, मावळमधील वडगाव मावळ, तळेगाव, काले, कार्ला, खडकाळा, लोणावळा येथे हलका पाऊस पडला.

Rain
Maharashtra Rain : कोकण, महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा

तर शिवणे येथे १९ मिलिमीटर पाऊस पडला. वेल्ह्यातील पानशेत, विंझर, आंबवणे येथे तुरळक पाऊस पडला. जुन्नरमधील बेल्हा येथे ५३ मिलिमीटर, तर निमगाव सावा २७, नारायणगाव ३६ मिलिमीटर, तर वडगाव आनंद, राजूर, डिंगोरे, आपटाळे, ओतूर हलका पाऊस झाला. खेडमधील वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, कडूस येथे जोरदार शिडकावा झाला.

आंबेगावमधील पारगाव येथे ४८ मिलिमीटर, तर घोडेगाव ३२ मिलिमीटर पाऊस पडला असून कळंब, मंचर चांगलाच पाऊस झाला. शिरूरमधील पाबळ येथे ४८ मिलिमीटर, तर टाकळी, वडगाव, न्हावरा, रांजणगाव, कोरेगाव, शिरूर येथे हलका पाऊस पडला. बारामतीतील माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव, उंडवडी, इंदापुरातील भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, निमगाव, अंथुर्णी, सणसर, दौंडमधील पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड, पारगाव, बोरी पार्धी, पुरंदरमधील सासवड, भिवंडी, कुंभारवळण, जेजुरी, राजेवाडी, वाल्हा येथे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे हवेत काहीसा गारवा तयार झाला. तुरळक ठिकाणी झालेल्या पावसामुळे शेतात चांगलेच पाणी साचल्याने पिकांचे काही प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com